IIFA2017 : बॉलिवूडप्रेमींच्या प्रेमाची साक्ष देणारा ‘आयफा’ सोहळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2017 11:10 AM
१३ जुलै ते १५ जुलै अशा तीन दिवस न्यूयॉर्कमध्ये यंदाचा आयफा अवार्ड रंगला. अमेरिकेत राहणारे भारतीयच नाही तर बॉलिवूडप्रेमी ...
१३ जुलै ते १५ जुलै अशा तीन दिवस न्यूयॉर्कमध्ये यंदाचा आयफा अवार्ड रंगला. अमेरिकेत राहणारे भारतीयच नाही तर बॉलिवूडप्रेमी अमेरिकींनीही हा सोहळा डोक्यावर घेतला. टाईम्स स्क्वेअरच्या शेरेटन हॉटेलापासून तर मुख्य टाईम्स स्क्वेअरच्या मध्ये उभारलेल्या शामियान्यापर्यंत जणू बॉलिवूडप्रेमींची जत्रा भरली होती. मेटलाईफ स्टेडियममध्ये दोन दिवस रंगलेल्या आयफा रॉक्स आणि आयफा पुरस्कार सोहळ्यालाही गर्दी नुसती ओसंडून वाहत होती.बॉलिवूड सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी, त्यांचा आॅटोग्राफ घेण्यासाठी चाहते जणू वेडे होते. वरूण धवन, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, सलमान खान असे अनेक टॉप सेलिब्रिटी दोन दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले होते. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरणाºया या अनेक सेलिब्रिटीमुळे चांगलाच माहौल तयार झाला होता.अमेरिकेतील भारतीय आयफा वीकेंडच्या तीन दिवसांत बॉलिवूडमय झाले होते, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. शेरेटन हॉटेलच्या लॉबीमध्ये सेल्फी स्टिक घेतलेल्या चाहत्यांचा उत्साह दांडगा होता. निश्चितपणे सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी उतावीळ झालेल्या या चाहत्यांचा उत्साह बॉलिवूड सेलिब्रिटींनाही सुखावणारा होता. प्रेस कॉन्फरन्सने आयफा वीकेंडची सुरुवात झाली. न्यूयॉर्कच्या शेरेटन हॉटेलचा हॉल यावेळी खचाखच भरलेला होता. १७ वर्षांपासून सुरु असलेल्या या सोहळ्याचे ग्लॅमर दिवसेंदिवस वाढतेच आहे, हे जणू त्यावरून जाणवत होते.सुपरस्टार सलमान खान, वरूण धवन, आलिया भट्ट, अनुपम खेर, सुशांत सिंह राजपूत, क्रिती सॅनन अशा अनेकांनी या पत्रपरिषदेला हजेरी लावली. मीडियाच नाही तर चाहत्यांनी या पत्रपरिषदेला गर्दी केली होती. भारतातील सुप्त शक्ती बॉलिवूडच्या माध्यमातून जगाला दाखवण्याची संधी या सोहळ्यातून साधली जातेय, हे आयफा आयोजकांचे शब्दही खूप काही सांगून गेलेत.सलमान ठरला किंगआयफाच्या या तीन दिवस रंगलेल्या सोहळ्याचे आकर्षण म्हणाल तर सलमान खान. होय, आयफाची पत्रपरिषद सलमानने खºया अर्थाने गाजवली. पत्रपरिषदेत कॅटरिना कैफला बर्थ डे विश करण्यापासून तर तिला मिठी मारण्यापर्यंतच्या त्याच्या वागण्याच्या बातम्या झाल्यात. स्टेजवरून खाली उतरणाºया एका वृद्धाला मदतीचा हात देणारा सलमान यावेळी सगळ्यांनाच भावला.कॅटरिना कैफही ठरली आकर्षणकॅटरिना कैफनेही आयफा सोहळा गाजवला. आयफाचा पुरस्कार सोहळा रंगला, त्याचदिवशी कॅटरिनाचा वाढदिवस होता. त्यामुळे सोहळ्यात सर्वांनी कॅटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सलमानने तर तिच्यासाठी खास गाणे गायले. हा क्षण कॅटरिनालाच नाही तर समोर बसलेल्या गर्दीलाही अपील झाला.आयफा रॉक्सप्रेस कॉन्फरन्स गाजलीच. त्यानंतर दुसºया दिवशीचा आयफा रॉक्स हा इव्हेंटही प्रचंड गाजला. नाही म्हणायला पावसाने या इव्हेंटमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे हा इव्हेंट काहीसा उशीरा सुरु झाला. या इव्हेंटमध्ये ए. आर. रहमान परफॉर्म करणार होता. पावसाने रहमानच्या चाहत्यांना बरेच तास ताटकळत ठेवले. पण म्युझिशियन, डान्सर व टेक्निशिअनच्या ३० जणांच्या टीमसोबत रहमानने असा काही ‘समां’ बांधला की, सगळे मंत्रमुग्ध झालेत. रहमानने या कॉन्सर्टमध्ये फार कमी हिंदी गाणी गायल्याने श्रोते नाराज झाल्याच्या बातम्या आल्या. पण या बातम्यांपलीकडे रहमानला ऐकण्यासाठी भरपावसात प्रेक्षक ठाण मांडून बसले, हे कमी नव्हतेच. होस्ट मनीष पॉल आणि रितेश देशमुख यांनी आयफा रॉक्स खºया अर्थाने गाजवला. त्यांच्या कोपरखळ्या आणि यानंतरचे परफार्मन्स सगळेच धम्माल करणारे होते.आयफा नाईटयानंतर रंगली ती आयफा नाईट अर्थात आयफा पुरस्कार वितरण सोहळा. आलिया भट्टच्या परफॉर्मन्सने सुरु झालेली ही रात्र उत्तरोत्तर रंगत गेली. पुरस्कार विजेत्यांसोबत प्रेक्षकांचा जबरदस्त उत्साह, एकापेक्षा एक असे दमदार परफॉर्मन्स अशी ही रात्र संस्मरणीय ठरली. ए. आर. रहमान याने बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याबदद्ल त्याला या सोहळ्यात गौरविण्यात आले. आलिया भट्ट व शाहिद कपूर या दोघांना अनुक्रम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा देखणा सोहळा बॉलिवूड प्रेमींच्या प्रेमाची साक्ष देणारा होता. सोबतच बॉलिवूडच्या वाढत्या ग्लॅमरची प्रचिती देणाराही होता.