बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. आधी ती प्रेग्रेंन्सी एन्जॉय करत होती. आता ती मुलाच्या संगोपनात व्यस्त आहे. एवढ्यात अभिनेत्री कमबॅक करण्याचा कोणत्याच प्लान नाही. सध्या तिचं बाळ तिची पहिली प्रायॉरिटी आहे.
इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर मुलगा कोआसोबतचा एक फोटो शेअर केला. ज्यात कोआची एक झलक पाहायला मिळतेय. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, '2 महिने झाले. फोटोतमध्ये अभिनेत्रीने बाळाला कडेवर उचलून घेतलं आहे. आई आणि मुलाच्या या सुंदर फोटोने नेटकऱ्यांचं मनं जिंकली आहेत. अलिकडेच इलियाना मुलगा कोआचा फोटो शेअर करत बाळाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली होती.
तर ही अभिनेत्री आहे इलियाना डिक्रुझ(Illeana D'cruz). मूळची पोर्तुगलची असलेली अभिनेत्री खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. 'बर्फी' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी ती साऊथमध्ये काम करत होती. इलियानाला बर्फी सिनेमात खूप पसंत केले गेले. पुढे तिने अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवनसोबतही स्क्रीन शेअर केली. इलियाना बराच काळ एका फॉरेनरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्यांचा ब्रेकअप झाला तेव्हा तिच्या ब्रेकअपची खूप चर्चा झाली. इलियानाने लग्नाशिवायच बाळाला जन्म दिला. प्रेग्नेंन्सीदरम्यान तिनं बॉयफ्रेंड मायकलसोबतचा फोटो शेअर केला होता.