बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D'Cruz) इंटरनेटवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. इलियानाच्या चित्रपटाचीच नाही तर तिच्या पर्सनल लाईफच्या फोटोंची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करतात. इन्स्टाग्राम अकाऊंटवर इलियाना सतत ग्लॅमरस व बोल्ड फोटो शेअर करत असते. आता तिने तिचा बेडरूम सेल्फी पोस्ट केला आहे. आता बेडरूम सेल्फी म्हटल्यावर चाहत्याच्या कमेंट्सही येणारच.‘स्वत:वर प्रेम करा,’ असा संदेश हा सेल्फी शेअर करत तिने दिला आहे. ‘स्वत:वर प्रेम करण्याचा दिवस. स्वत:सोबत दयाळू व्हा, स्वत: स्वत:ला मिठीत घ्या आणि सतत सोबत करणा-या शरीराचे आभार माना. अद्भूत अनुभवांचा आनंद घ्या,’ अशा आशयाचे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
पण या कॅप्शनकडे लक्ष न देता काही लोकांनी तिच्या कपड्यांवर कमेंट्स केल्या आहेत. तू कपडे घातले नाहीस का?, असा सवाल एका चाहत्याने केला आहे. तर एकाने नको ती मागणी करत, प्लीज फक्त अंगावर घेतलेली चादर बाजूला कर, अशी कमेंट केली आहे.इलियाना गेल्या अनेक वर्षांपासून बॉडी डिस्मॉर्फिया नावाच्या आजाराने पीडित होती. या आजारात शरीराचा शेप बिघडतो. ज्यामुळे शरीराचा आकार वेगळा दिसायला लागतो. याकाळात इलियाना डिप्रेशनमध्ये गेली होती. केवळ इतकेच नाही तर तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पण योग्य उपचारांच्या मदतीने इलियाना या आजारातून बाहेर पडली.
इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडेच इलियाना डिक्रूझचा ‘द बिग बुल’ या चित्रपटात दिसली होती. इलियानाने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इलियानाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका तेलगू चित्रपटातून केली. यानंतर तिने देवदासू, केडी, खतरनाक अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा आगामी चित्रपट तेरा क्या होगा लवली आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा देखील आहे.