Join us

Ileana D'Cruz च्या बिकीनी लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ, बोल्डनेस पाहून फॅन्सची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 16:36 IST

Ileana D'Cruz : नुकतेच इलियानाने मालदीवचे वेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D'Cruz) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव आहे. ती नेहमीच तिचे फोटो फॅन्ससोबत शेअर  करत असते. नुकतेच इलियानाने मालदीवचे वेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. इलियानाच्या बिकीनी अवताराची चांगलीच चर्चा आहे. फॅन्स कमेंट्स करून तिचं भरभरून कौतुक करत आहेत. 

हे फोटो इलियानाने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. लेटेस्ट पोस्टमध्ये इलियाना व्हाइट ऑफ शोल्डर बिकीनीमध्ये दिसत आहे. तेच दुसऱ्या फोटोत ती रेड कलरच्या बिकिनीत दिसत आहे. इलियानाच्या या बोल्ड अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यासोबतच तिने एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. ज्यात ती पूलवर एन्जॉय करताना दिसत आहे.

इलियानाच्या या पोस्टवर फॅन्सने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. फॅन्स 'हॉटनेस ओवरलोडेड', 'बोल्ड एंड ब्यूटीफूल' आणि 'हॉटनेस अलर्ट' अशा कमेंट्स करत आहेत. एकंदर काय तर तिचा हा बोल्ड अवतार तिच्या फॅन्सना खूप आवडला आहे. 

वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर गेल्यावेळी इलियाना 'द बिग बुल' सिनेमात दिसली होती. ज्यात तिने मीरा राव नावाच्या जर्नलिस्टचा रोल केला होता. सिनेमात मुख्य भूमिकेत अभिषेक बच्चन होता. इलियाना लवकरच 'अनफेयर एंड लवली' (Unfair And Lovely) मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. 

 

टॅग्स :इलियाना डीक्रूजसोशल मीडिया