Join us

तू कोणत्या वयात व्हर्जिनिटी गमावलीस? अन् चाहत्याच्या प्रश्नाने तिची सटकली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 12:46 PM

चाहत्यांसाठी तिने ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन ठेवले. पण यादरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाने तिची सटकली आणि तिने या चाहत्याला सडेतोड उत्तर दिले.

ठळक मुद्देसध्या इलियाना तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह राहतात. चाहत्यांशी रोज नवा संवाद साधतात. स्वत:चे फोटो, व्हिडीओ शेअर करत आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक क्षण चाहत्यांशी शेअर करतात. इलियाना डिक्रूज ही सुद्धा याला अपवाद नाही. नुकताच इलियानाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांसाठी तिने ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन ठेवले. पण यादरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाने इलियानाची सटकली आणि तिने या चाहत्याला सडेतोड उत्तर दिले.

होय,  तू कोणत्या वयात तुझी व्हर्जिनिटी गमावलीस? असा प्रश्न चाहत्याने विचारला. चाहत्याचा हा प्रश्न पाहून इलियाना संतापली. मग काय, तिने त्याला जाम फैलावर घेतले. ‘छान.. दुसºयांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याची तुला फा हौस दिसते. या प्रश्नावर यावर तुझी आई काय उत्तर देईल?’, असा प्रतिप्रश्न तिने या चाहत्याला केला. तिचे हे उत्तर ऐकून चाहत्याची बोलती बंद झाली नसेल तर नवल.

इलियाना लवकरच अनिस बाज्मी यांच्या ‘पागलपंती’ या कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, पुलकित सम्राट यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सध्या खरे तर इलियाना तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. दीर्घकाळापासून महिन्यांपासून इलियाना आॅस्ट्रेलियातील फोटोग्राफर अँड्रयूशी नीबॉनला डेट करत होती. मध्यंतरी तिने गुपचूप लग्न केल्याची चर्चा होता. एवढेच नाही तर इलियाना प्रेग्नेंट असल्याचीदेखील चर्चा रंगली होती. मात्र आताश: इलियाना आणि अँड्रयूचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. इलियाने इन्स्टाग्रामवरुन अँड्रयूचे सगळे फोटो डिलीट केले आहेत.  

टॅग्स :इलियाना डीक्रूज