Join us  

फोटोमध्ये पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसणारी चिमुरडी आज आहे बॉलिवूडची अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 2:58 PM

अभिनेत्रीचा लहानपणीचा या फोटोने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.फोटोत दिसणारी ही मुलगी आज बॉलीवूडची टॉप अभिनेत्री बनली आहे.व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक लहान मुलगी पांढऱ्या रंगाचा परीसारखा ड्रेस घातल्याचे दिसतंय.

सोशल मीडियावर दररोज कोणत्या ना कोणत्या सेलिब्रेटीची चर्चा रंगलेली असते.मग ते खासगी कारण असो किंवा मग त्यांच्या करिअरबाबतीत चर्चा तर होतेच. विशेषतः बॉलिवूड स्टार्सचे फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत असतात. त्यांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा असतो.सध्या असाच एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोला बघून चाहते कमेंट्स करत अभिनेत्रीला ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. 

अभिनेत्रीचा लहानपणीचा या फोटोने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.फोटोत दिसणारी  ही मुलगी आज बॉलीवूडची टॉप अभिनेत्री बनली आहे.व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक लहान मुलगी पांढऱ्या रंगाचा परीसारखा ड्रेस घातल्याचे दिसतंय. तिच्यासोबत इतरही अनेक मुली दिसत आहेत.ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री इलियाना डिक्रूज आहे.

इलियानाने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले, त्यानंतर  2012 मध्ये रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रासोबत 'बर्फी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इलियानाचा समावेश त्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये होतो ज्यांना गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाते.अलीकडेच कतरिना कैफसोबत इलियाना डिक्रूझचे काही फोटोही व्हायरल झाले होते. 

मालदीवमध्ये कतरिनाच्या वाढदिवसावेळी इलियानाही उपस्थित होती. तिथून, विकी कौशल आणि कतरिनाने इंस्टाग्रामवर चाहत्यांसह अनेक खास फोटो शेअर केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इलियाना डिक्रूज कतरिना कैफचा भाऊ सेबेस्टियनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते जिथे ती अनेकदा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

इलियानाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला होता. याच्या कॅप्शनमध्ये तिने क्रेडिट ब्वॉयफ्रेंड अँड्रयू निबोनला देताना तो हबी म्हणजेच हसबंड असल्याचे नमूद केले होते. इलियानाच्या या पोस्टनंतर इलियानाने अँड्रयूशी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावर  दोघांकडून यावर आतापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.