सर्वांसमोर मागून ड्रेस फाटला असतानाही इलियाना डीक्रुजला नव्हते भान, वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 4:35 PM
अभिनेत्री इलियाना डीक्रुज हिच्यासोबत एक किस्सा घडला होता, ज्यामुळे तिच्यात सर्वांसमोर अपमानित झाल्याची भावना निर्माण झाली होती. वाचा नेमका काय आहे किस्सा!
अभिनेत्री इलियाना डीक्रूज हिला बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीमध्ये गणले जाते. गेल्या काळातच तिचे ‘बादशाहो’ आणि ‘मुबारका’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांना प्रचंड पसंती दिली. इलियाना तिच्या चित्रपटांबरोबर तिच्या सुंदरतेमुळेही नेहमीच चर्चेत असते. मुंबईमध्ये जन्मलेल्या इलियानाने गोवा येथे तिचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात तिला हिंदीमध्ये बोलताना बºयाच अडचणी येत होत्या. कारण हिंदीच्या तुलनेत तिला इंग्रजी बोलणे अधिक सोयिस्कर व्हायचे. असो, इलियानाच्या बॉलिवूड करिअरविषयी सांगायचे झाल्यास पहिल्याच चित्रपटात तिने तिची छाप सोडली होती. २०१२ मध्ये आलेल्या अनुराग बसूच्या ‘बर्फी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. वास्तविक इलियाना २००६ पासूनच अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तिने बºयाचशा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले. पुढे तिने बॉलिवूडमध्ये नशीब आजमाविले. पहिल्याच ‘बर्फी’ या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यूट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. मात्र हा पुरस्कार तिच्यासाठी सर्वच अर्थाने अविस्मरणीय ठरला. होय, जेव्हा इलियाना हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेली तेव्हा तिच्यासोबत एक अशी काही घटना घडली ज्यामुळे तिला सर्वांसमोर अपमानित झाल्यासारखे वाटले. त्याचे झाले असे की, जेव्हा इलियानाला अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर बोलाविण्यात आले तेव्हा ती ‘बर्फी’च्या संपूर्ण टीमसोबत स्टेजवर पोहोचली. मात्र स्टेजवर जातानाच तिचा ड्रेस मागच्या बाजूने फाटला. ज्यामुळे तिची ड्रेस सावरताना चांगलीच दमछाक झाली. इलियानाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘जेव्हा माझ्यासोबत हा प्रकार घडला होता तेव्हा मी प्रचंड घाबरली होती.’ खरं तर जेव्हा इलियानाचा ड्रेस फाटला होता तेव्हा तिलाही याबाबत माहिती नव्हते. विशेष म्हणजे तिच्या टीममधील कोणीही ही बाब नोटीस केली नव्हती. तिने अवॉर्ड स्वीकारल्यानंतर हा संपूर्ण प्रकार तिच्या लक्षात आला. मात्र ड्रेस फाटला असताना तिला भान कसे नव्हते? असा प्रश्नही तिच्या टीममधील लोकांना पडला होता. त्यावर्षी बर्फीने फिल्मफेअर अवॉर्डमध्ये चांगलीच छाप सोडली होती.