अखेर लग्नाच्या चर्चेवर बोलली इलियाना डिक्रूज !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 05:26 AM2018-02-07T05:26:37+5:302018-02-07T11:00:30+5:30

अभिनेत्री इलियाना डिक्रूज अखेर तिच्या लग्नाच्या चर्चांवर बोलली आहे. क्रिसमसच्या दरम्यान इलियानाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला ...

Ilya Dikruz talks on marriage talks finally! | अखेर लग्नाच्या चर्चेवर बोलली इलियाना डिक्रूज !

अखेर लग्नाच्या चर्चेवर बोलली इलियाना डिक्रूज !

googlenewsNext
िनेत्री इलियाना डिक्रूज अखेर तिच्या लग्नाच्या चर्चांवर बोलली आहे. क्रिसमसच्या दरम्यान इलियानाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोचे क्रेडिट तिने आपल्या पतीला दिले होते. या फोटोनंतर बॉलिवूडमध्ये इलियानाच्या लग्नाची चर्चा झाली होती. मात्र इलियानाने यावर अजून मात्र कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. इलियानाने लग्नाची गोष्ट स्वीकारली नव्हती किंवा याला नकारसुद्धा दिला नव्हता. 

इलियाना जेव्हा आपला आगामी चित्रपट रेडच्या ट्रेलर लाँचला पोहोचली त्यावेळी चित्रपटातील तिच्या सहकलाकार असलेल्या अजयने तिला लग्नाबाबत छेडलेच. यावर इलियाना म्हणाली की,  मला खरंच कळत नाही आहे यावर मी काय भाष्य करू ते. प्रोफेशन लाईफमध्ये मी चांगले काम करते आहे तसेच माझी पर्सनल लाईफ ही पुढे जाते आहे. मला नाही वाटत मला यावर काही कमेंट करायला हवी. मला माझ्या पर्सनल लाईफ गुप्त ठेवायची आहे. यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही पण लोकांना माझे पर्सनल लाईफ बऱ्यापैकी माहित आहे.    

बॉयफ्रेन्ड अ‍ॅन्ड्र्यू नीबोनसोबत इलियानाने लग्न केल्याचे कळतेय. खरे याआधीही इलियानाच्या सीक्रेट मॅरेजच्या बातम्या आल्या आहेत. इलियानाने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि विशेष म्हणजे, या फोटोच्या कॅप्शनमध्ये बॉयफ्रेन्ड अ‍ॅन्ड्र्यूचा उल्लेख ‘हबी’ असा केला होता. फॅमिली फोटो बाय हबी, असे कॅप्शन इलियानाने या फोटोला दिले होते. त्यानंतर तिच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते. अ‍ॅन्ड्र्यू एक फोटोग्राफर आहे.  

ASLO READ :  इलियाना म्हणते, ''मी स्वत:ला सेलिब्रेटी समजत नाही''

इलियानाचा आगामी चित्रपट 'रेड’ लखनौच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. १९८१ मधील देशातील सर्वात मोठा हायप्रोफाईल आयकर धाडीचे कनेक्शन यात दाखवले आहे. या चित्रपटात अजयने लखनौतील अमय पटनायक नामक एका डेप्युटी कमिशनरचे पात्र साकारले आहे. ट्रेलरवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे, या चित्रपटात आयकर विभागाचे छापे आणि भ्रष्टाचाराची एक मजेशीर लढाई पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Ilya Dikruz talks on marriage talks finally!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.