Join us  

आय एम डान्स लाईक मायकल जॅक्सन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2016 11:16 AM

- वीरेन्द्रकुमार जोगीसंपूर्ण जगाला पॉप संगीताच्या तालावर नाचवणारा पॉप संगीताचा बादशहा म्हणजे मायकल जॅक्सन. मायकल जगातून गेला. पण ...

- वीरेन्द्रकुमार जोगीसंपूर्ण जगाला पॉप संगीताच्या तालावर नाचवणारा पॉप संगीताचा बादशहा म्हणजे मायकल जॅक्सन. मायकल जगातून गेला. पण जगाच्या पाठीवर त्याच्या चाहत्यांची कमतरता नाही. आपले बॉलिवूडही त्याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्ये मायकलचे असंख्य चाहते आहेत.  मायकल जॅक्सनची सिग्निचर स्टेप मून वॉक करताना बेभान होणारे, त्याच्या पॉप संगीतावर थिरकताना गुरुत्वाकर्षणाचे सर्व नियम विसरणारे अनेक आहेत. फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा टायगर श्रॉफ हाही मायकलचा चाहता आहे. टायगरची प्रमुख भूमिका असलेला ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करीत टायगरने मायकलला ट्रिब्यूट दिले आहे. याचनिमित्ताने मायकलवर प्रेम करणाºया अशाच काही बॉलिवूड कलाकारांविषयी.टायगर श्रॉफ बॉलिवूडमध्ये डान्सिंग स्टार म्हणून टायगरने आपली ओळख निर्माण करीत आहे. फ्लार्इंग जट या चित्रपटात टायगर मायकल जॅक्सनची सिग्निचर स्टेप मून वॉक करताना दिसला होता. त्याचा आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकल’ मध्ये तो मायकल जॅक्सनचा फॅन असल्याचे दिसणार आहे. प्रभू देवा भारतातील मायकल जॅक्सनचा सर्वांत मोठा चाहता म्हणून प्रभू देवाचे नाव घेतले जाते. भारतातील सर्वोत्कृष्ठ डान्सर म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. संगीतकार ए.आर रहेमानसोबत ‘मायकल जॅक्सन अ‍ॅण्ड फ्रेण्डस्’ नावाने परदेशात अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. ‘मिन्सारा कुनाऊ’ (1997) व ‘लक्ष्य’ (2004) या चित्रपटातील नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेता, दिग्दर्शक व कोरिओग्रॉफर म्हणून तो चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकेत दिसत असला तरी त्याची ओळख भारतीय मायकल जॅक्सन अशीच आहे. वरुण धवन वरुण धवनने कॉमेडी, अ‍ॅक्शन व डान्स यामधून आपली ओळख निर्माण करीत आहे. विशेष म्हणजे वरुणच्या डान्स स्टेप्स मायकल जॅक्सनच्या डान्स सारख्याच आहे. एबीसीडी या चित्रपटात त्याने केलेला डान्समध्ये मायकल जॅक्सनची झलक पहायला मिळते. याशिवाय त्याच्या इतरही चित्रपटात तो मायकलला कॉपी करताना दिसतो. गोविंदा आपल्या करिअरच्या सुरुवातीला गोविंदाने डान्स स्टार म्हणून ओळख मिळविली होती. त्याच्या अनेक डान्स स्टेपमध्ये तो मायकल जॅक्सनला कॉपी करताना दिसला आहे. ‘राजबाबू’ या चित्रपटातील टायटल साँग पाहिल्यावर गोविंदादेखील मायकल जॅक्सनचा फॅन असल्याचे दिसते.जावेद जाफरीभारतात ब्रेक डान्सला इंट्रोड्युस करण्याचे श्रेय  जावेद जाफरीला दिले जाते. बॉलिवूडमध्ये जावेद डान्सर म्हणून ओळख मिळवू शकला नसला तरी आजही तो चांगला डान्सर म्हणून ओळखला जातो. करिअरच्या सुरुवातीला जावेद जाफरी मायकल जॅक्सनच्या डान्स स्टेप्स कॉपी करताना दिसला.हृतिक रोशन बॉलिवूडमध्ये हृतिक रोशन आपल्या खास डान्ससाठी ओळखला जातो. त्याचा डान्सवर मायकल जॅक्सनचा प्रभाव जाणवत नसला तरी ‘लक्ष्य’ व ‘क्रेझी फ ोर’ या चित्रपटात त्याने केलेल्या डान्स स्टेप्स मायकल जॅक्सनच्या डान्सस्टेप्सने प्रभावित होत्या हे विशेष.अनेकांनी केला प्रयत्न मायकल जॅक्सनच्या डान्स स्टेप्स फॉलो करण्याचा प्रयत्न अनेक बॉलिवूड स्टार्सनी केला आहे. यात जितेंद्र, मिथून चक्रवर्ती, ॠ षी कपूर, सनी देओल, शाहरुख खान यांचाही सामवेश आहे. बी सुभाष यांनी मिथुन चक्रवर्ती सोबत डिस्को डान्सर हा चित्रपटाची निर्मिती केली. यात मिथुन मायकल जॅक्सनच्या वेशभूषेत दिसला होता. कर्जमध्ये ॠ षी कपूरने मायकल जॅक्सनसारखा पहेराव केला होता, सनी देओलने जिद्दी चित्रपटात मायकल जॅक्सनची डान्स स्टेप फॉलो केली होती. कोरिओग्रॉफर्स साठी प्रेरणास्त्रोतबॉलिवूडचे अनेक कोरिओग्रॉफर मायकल जॅक्सनपासून प्रेरित आहेत. प्रभू देवाचा तो देवच म्हणावा लागेल, तर रेमो डिसूजा मायकल जॅक्सनला आपले प्रेरणास्थान मानतो. फरहा खान हिने ‘हॅप्पी न्यू ईअर’च्या माध्यमातून मायकल जॅक्सनला ट्रिब्यूट दिले होते.