अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना ड्रग्ज अँगल सापडल्यानंतर चौकशी दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली. रियाला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तिची रवानगी भायखळ्यातील महिलांच्या जेलमध्ये करण्यात आली आहे. रियाने जामीन मिळावा यासाठी मुंबई सेशन कोर्टात अर्ज केला आहे.
'आपण निरपराध आहोत. आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. यामुळे आपल्याला जामीन द्यावा,' असे रियाने आपल्या जामीन अर्जात म्हटले आहे. रियाच्या या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यावेळी तिची सुटका होते की ती जेलमध्येच काही दिवस राहते, हे स्पष्ट होणार आहे.
रियाला कोठडीच्या शेजारी आहे इंद्राणी मुखर्जीआज तकच्या रिपोर्ट्सनुसार, रिया चक्रवर्तीच्या कोठडीच्या बाजूच्या कक्षात शीना बोरा हत्यांकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीदेखील आहे. रियाला सामान्य कक्षात ठेवलेले नाही तिला वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. जेलचे प्रशासनाकडून रियाच्या सुरक्षेला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?'
कशी गेली तुरूंगात कालची रात्ररिया चक्रवर्तीची काल दुपारनंतर जेलमध्ये रवानगी करण्यात आली. मुंबईतील भायखळा जेलमध्ये रियाला वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे. जेलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रियाला रात्री जेवण दिले गेले ज्यात दोन चपाती, डाळ आणि भाजी दिली होती.
८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटीज घेतात ड्रग्स - रिया
मीडिया रिपोर्टनुसार, आपल्या जामिन याचिकेदरम्यान रियाने धक्कादायक दावा केला आहे. ती यावेली म्हणाली की, ८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटीज ड्रग्स घेतात.