आयकर विभागाने ३ मार्च रोजी म्हणजेच बुधवारी टॅक्स चोरी प्रकरणात निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर छापे टाकले. असे सांगितले जात होते की, फॅन्टम फिल्म कंपनीच्या कथित कर चुकवेगिरी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ताज्या अपडेट्सनुसार आयकर विभागाने शुक्रवारी उशीरा रात्री पर्यंत अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूशी ३५० कोटी कर चोरीच्या प्रकरणी चौकशी केली. यादरम्यान आता तीन दिवसानंतर तापसी पन्नूने तिच्यावर लागलेल्या आरोपांवरील चुप्पी तोडली आहे.
पहिल्या पोस्टमध्ये तापसी पन्नूने ट्विटमध्ये लिहिले की, तीन दिवस केलेल्या कसून चौकशीतून तीन गोष्टी समोर आल्या आहेत. पॅरिसमधील ज्या कथित बंगल्याची चावी माझ्याकडे असल्याचे बोलले जात आहे, ज्याची मी स्वतः मालकीण आहे. तिथे मी कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलेले नाही.
पाच कोटींची पावती मिळाल्याच्या आरोपावर तापसीने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, पाच कोटींची कोणतीच रिसिप्ट तिच्याकडे नाही आणि नाही तिने असे कोणते पैसे घेतले आहेत.
शेवटच्या तिसऱ्या पोस्टमध्ये ती म्हणाली की, २०१३मधील कोणत्याच छापेमारीशी तिचा संबंध आहे. तिने लिहिले की, अर्थमंत्री यांच्यानुसार, २०१३ ला माझ्या येथे छापे टाकले होते. आता स्वस्त कॉपी नाही. असे म्हणत तापसीने कंगनावर निशाणा साधला कारण कंगना राणौतने तिला बऱ्याचदा स्वस्त कॉपी असे संबोधले आहे.
तापसी पन्नूच्या या ट्विट्सवरून स्पष्ट होते की कोणत्या तीन गोष्टींच्या आधारावर तिच्या घरावर छापे टाकण्यात आली होती. तिने ट्विट्सच्या माध्यमातून तिच्यावर करण्यात आलेले आरोपांत तथ्य नसल्याचे सांगितले आहे. सध्या आयटी विभागाची तपासणी कुठपर्यंत पोहचली आहे आणि त्यांचा काय निष्कर्ष आहे, हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे.