Join us

तृप्ती डिमरीच नंबर १! दीपिका आणि आलियालाही टाकलं मागे, २०२४ मधील टॉप १० लोकप्रिय कलाकारांची यादी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:06 IST

२०२४ मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची यादी घोषित केली. या टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत 'अॅनिमल' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या तृप्ती डिमरीने पहिलं स्थान गाठलं आहे. तृप्तीने दीपिका पादुकोण आणि आलिया भटलाही मागे टाकलं आहे. 

IMDb (www.imdb.com) या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील  माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने २०२४ मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची यादी घोषित केली. या टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत 'अॅनिमल' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या तृप्ती डिमरीने पहिलं स्थान गाठलं आहे. तृप्तीने दीपिका पादुकोण आणि आलिया भटलाही मागे टाकलं आहे. 

IMDb वरील जगभरातील दर महा 25 कोटींहून अधिक दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार ही क्रमवारी निर्धारित झाली. यामध्ये २०२४ मधील भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांमध्ये तृप्ती डिमरी नंबर वन ठरली आहे.  यावर्षी तिने बॅड न्यूज, विकी विद्या का वो वाला विडियो, आणि भूल भुलैया 3 ह्या तीन चित्रपटांमध्ये भूमिका केल्या व जगभरातील चाहत्यांनी ह्या भूमिकांचे कौतुक केले. तर दीपिका पादुकोण दुसऱ्या आणि आलिया भटला नवव्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. 

२०२४ मधील IMDb चे टॉप १० सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार1.    तृप्ती डिमरी 2.    दीपिका पादुकोण3.    इशान खट्टर4.    शाहरूख खान5.    शोभिता धुलिपाला6.    शर्वरी वाघ7.    ऐश्वर्या राय बच्चन8.    समांथा9.    आलिया भट10.    प्रभास

“२०२४ मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांच्या IMDb यादीमध्ये प्रस्थापित दिग्गज व उभरत्या प्रतिभावान कलाकारांच्या समावेशासह भारतीय मनोरंजन जगताचे वैविध्यपूर्ण प्रतिबिंब दिसते. आमच्या वार्षिक यादीमध्ये जागतिक श्रोत्यांच्या बदलणा-या आवडींचे प्रतिबिंब उमटते व शाह रूख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन असे दिग्गज कलाकार आजही दर्शकांची मने कशी आकर्षित करत आहेत व त्यासह तृप्ती डिमरी आणि शर्वरी हे नवीन कलाकारसुद्धा कसे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत, हेसुद्धा त्यामधून दिसते. भारतीय चित्रपट व त्यातील कलाकारांना मिळणारी आंतरराष्ट्रीय मान्यता कशी वाढत आहे, हेसुद्धा ह्या वर्षीच्या यादीमधून दिसते.”,असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया ह्यांनी म्हटले.

आपल्या चाहत्यांना धन्यवाद देताना तृप्ती डिमरी म्हणाली, “२०२४च्या IMDb सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीमध्ये क्रमांक १ वर स्थान मिळ‌णे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या चाहत्यांचे अविश्वसनीय सहकार्य व मला ज्यांच्यासोबत काम करता आले त्या सर्वांचे परिश्रम ह्याची ही पावती आहे. ह्या वर्षामध्ये मी अनेक उत्साहवर्धक प्रोजेक्टसवर काम केले आहे व भूल भुलैया 3 सह 2024 चा शेवट होत आहे व असे हे माझ्यासाठी संस्मरणीय वर्ष राहिले आहे. मी ह्या प्रेरणादायी प्रोजेक्ट्सचा भाग बनून पुढील काळात नवीन कॉन्टेन्टवर काम करत राहणार आहे.”

टॅग्स :तृप्ती डिमरीआलिया भटदीपिका पादुकोण