Join us

कुठलाही बदल केल्यास ‘इंदू सरकार’च्या कथेवर होणार परिणाम : मधुर भंडारकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2017 1:09 PM

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांचा ‘इंदू सरकार’ हा चित्रपट रिलीज अगोदरच वादाच्या भोवºयात सापडला आहे. चित्रपटाला कॉँग्रेसकडून तीव्र आक्षेप घेतला ...

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांचा ‘इंदू सरकार’ हा चित्रपट रिलीज अगोदरच वादाच्या भोवºयात सापडला आहे. चित्रपटाला कॉँग्रेसकडून तीव्र आक्षेप घेतला जात असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. अशात चित्रपटाच्या कथेत बदल केला जाण्याची भीती दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना वाटत आहे. त्यांच्या मते, चित्रपटात कुठल्याही प्रकारचा बदल केला जाऊ नये, असे केल्यास कथेच्या आशयावरच परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘इंदू सरकार’विषयी वाढता रोष लक्षात घेता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातून ‘आरएसएस’ आणि ‘अकाली’ हे शब्द काढण्याचे सांगितले आहे. भंडारकर यांनी गेल्या सोमवारी हा चित्रपट सीबीएफसीला दाखविला. त्यानंतर सीबीएफसीने चित्रपटात १२ कट आणि दोन ठिकाणी डिस्क्लॅमर देण्याचे सांगितले; मात्र ही बाब मधुर भंडारकर यांना फारशी पटलेली दिसत नाही. त्यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले की, ‘मी कुठल्याही प्रकारचा बदल करू इच्छित नाही. कारण यामुळे माझ्या चित्रपटाच्या आशयावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आता आम्ही पुनर्रीक्षण समितीकडे जाणार आहोत. ही समिती आम्हाला चित्रपट प्रदर्शनासाठी परवानगी देईल, अशी मला अपेक्षा आहे; मात्र त्यांनीही नकार दिल्यास आम्ही न्यायाधिकरण समितीकडे दाद मागणार आहोत. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने ‘भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाय हुआ है’ आणि ‘तुम लोग जिंदगीभर मॉँ-बेट की गुलामी करते रहोगे’ यासारखे संवाद काढण्यास सांगितले आहे. यावेळी वाढत्या राजकीय दबावामुळेच चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्ड कात्री चालवित आहे काय? असे जेव्हा मधुर भंडारकर यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी या प्रश्नाचे उत्तर सेन्सॉरकडूनच घ्यायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चित्रपटात नील नितीन मुकेश, कीर्ती कुल्हारि, सुप्रिया विनोद, अनुपम खेर आणि तोता रॉय चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचा मुलगा संजय गांधी यांच्याशी प्रेरित आहे. १९७५ च्या आणीबाणीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला सध्या कॉँग्रेसकडून तीव्र विरोध दर्शविला जात आहे. संजय गांधी यांची मुलगी असल्याचे सांगणाºया प्रिया सिंग पॉल या महिलेने तर मधुर भंडारकर यांना नोटीसही बजावली आहे. भंडारकर यांनी या अगोदरच स्पष्ट केले होते की, त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून कोणत्याही राजकीय विचारधारेचा प्रचार करायचा नाही. त्यामुळे होत असलेला विरोध आणि टीका अर्थहिन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी रिलीज होणार आहे.