Join us

​इमरानला चुकवावी लागते प्रत्येक चुंबनाची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2016 1:57 PM

चित्रपटातील चुंबन दृश्याबद्दल बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फेमस कोण? असा प्रश्न केल्यावर त्याचे एकच उत्तर मिळेल. इमरान हाश्मी. चित्रपटातील चुंबन दृश्यांमध्ये ...

चित्रपटातील चुंबन दृश्याबद्दल बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फेमस कोण? असा प्रश्न केल्यावर त्याचे एकच उत्तर मिळेल. इमरान हाश्मी. चित्रपटातील चुंबन दृश्यांमध्ये इमरान पुरता ‘बदनाम’ झाला आहे. हिरोईनला किस करतानाचा इमरान लोकांना भावत असला तरी, इमरानची पत्नी परवीन हिला याबद्दल काय वाटते? हा प्रश्न साहजिकच सर्वांनाच पडतो.  कुठल्याही पत्नीला पतीने कुणाला किस केलेले कसे खपेल? हा प्रोफेशनचा भाग असला तरी परवीनही यामुळे इमरानवर रागावते. मग काय, पत्नीची मनधरनी तर करायलाच हवी. या मनधरनीसाठी इमरानने एक फक्कड उपाय शोधून काढलायं. होय, परवीन व त्याच्यात या मुद्यावर डील झाली आहे. ही डील कसली माहितीय? किसच्या बदल्यात एक बॅग..अर्थात पर्स. होय, परवीन पर्सबद्दल क्रेझी आहे. इमरानने पडद्यावर घेतलेल्या प्रत्येक किससाठी परवीन एक बॅग त्याच्याकडून घेते. इमरान सांगतो, या डीलमुळे परवीनकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी कबर्ड भरून बॅग आहेत.. आहे ना मजेशीर...वेल डन इमरान...!!