Join us

जान्हवी, सारा इतकीच सुंदर आहे ‘या’ दिग्दर्शकाची लेक, पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 08:00 IST

नव्या स्टार किड्सच्या यादीतील सारा अली खान,जान्हवी कपूर, अनन्या पांडे, प्रनूतन बहल यांची नावे चर्चेत असताना आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. हे नाव म्हणजे, इदा अलीचे.

ठळक मुद्दे इम्तियाज अलीने प्रीती अलीसोबत लग्न केले होते. इदा ही या दांम्पत्याची मुलगी

नव्या स्टार किड्सच्या यादीतील सारा अली खान,जान्हवी कपूर, अनन्या पांडे, प्रनूतन बहल यांची नावे चर्चेत असताना आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. हे नाव म्हणजे, इदा अलीचे. ही इदा अली कोण तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अलीची मुलगी.इम्तियाज अली हे एक बॉलिवूडचे मोठे नाव आहे. बॉलिवूडला त्याने अनेक हिट चित्रपट दिलेत. आता पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत इदा अली ही सुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास तयार आहे.

ईदा कमालीची सुंदर आहे. पण म्हणून हिरोईन बनण्यात तिला जराही रस आहे. अ‍ॅक्टिंगऐवजी फिल्ममेकिंग क्षेत्रात तिला आपले करिअर घडवायचे आहे. होय, वयाच्या 16 व्या वर्षी इदाने ‘लिफ्ट’ नामक शॉर्ट फिल्म लिहिली आणि या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शनही केले.

‘लिफ्ट’ ही शॉर्ट फिल्म आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिली आहे. अलीकडे एका मुलाखतीत इदाने पित्याप्रमाणे एक उत्तम दिग्दर्शक बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. मला माझ्या वडिलांप्रमाणे बनायचे आहे. पण माझा मार्ग मी स्वत: बनवणार. सध्या त्याचमुळे मी वडिलांसोबत काम करत नाहीये. कारण यामुळे आमचे नाते कामाच्या आड येईल, असे मला वाटते, असे ती म्हणाली होती.

अदा सोशल मीडियावर कमालीची  अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर ती स्वत:चे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

 इम्तियाज अलीने प्रीती अलीसोबत लग्न केले होते. इदा ही या दांम्पत्याची मुलगी. 2012 मध्ये इम्तियाज व प्रीतीमध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर इदा ही आपल्या आईसोबत राहते. 

टॅग्स :इम्तियाज अली