ह्या चित्रपटातून दिग्दर्शक इम्तियाज अली करणार कोरिओग्राफीत पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:53 PM2018-08-24T12:53:00+5:302018-08-24T12:55:57+5:30
'लैला- मजनू' या चित्रपटातून इम्तियाज अली कोरिओग्राफीत पदार्पण करत आहे.
'जब वी मेट', 'रॉकस्टार' व 'हायवे' यांसारख्या चित्रपटातून प्रेमकथा अत्यंत प्रभावीपणे मांडणारा दिग्दर्शक आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता साजिद अली दिग्दर्शित 'लैला मजनू' चित्रपटाच्या निमित्ताने कोरियोग्राफीमध्ये पदार्पण करतो आहे.
इम्तियाज अलीचा भाऊ साजिद अलीने 'लैला मजनू' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर दिग्दर्शक म्हणून साजिदचा हा पहिलाच चित्रपट आहे. याची पटकथा इम्तियाजने लिहिली असून 'सरफिरी...' या गाण्याची कोरिओग्राफी त्याने केली आहे.
कोरिओग्राफी क्षेत्रात पदार्पण करण्याबद्दल इम्तियाज मजेशीरपणे म्हणतो की, आता जर माझे बरेच मित्र कोरिओग्राफर होऊन मला घाबरवत आहेत. तर मीसुद्धा विचार केला आहे की कोरिओग्राफी करत त्यांना धक्का देतो. गाण्यांच्या सिनेमॅटोग्राफीबद्दल सुरुवातीपासूनच आवड असल्याचे त्याने सांगितले.
'लैला मजनू'ची प्रेमकथा सर्वाधिक ऐतिहासिक प्रेमकथांपैकी एक आहे. याआधीही लैला मजनूच्या अमर प्रेमकथेवर बॉलिवूड चित्रपट बनला आहे. या चित्रपटात ऋषि कपूरने मजनूची भूमिका साकारली होती. आता हीच कथा एका मॉडर्न रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. लैला मजनू दोघेही पाकिस्तानात राहणारे होते. श्रीमंत घराण्यातील मजनूचा गरिब कुटुंबातील लैलावर जीव जडतो. लैलाच्या भावाला तिच्या या प्रेमाबद्दल करते आणि तो मजनूची हत्या करतो. लैलाला हे कळते तेव्हा ती मजनूच्या मृतदेहाजवळ जात तिथेच आत्महत्या करते. लैला मजनूबद्दल आणखीही एक कथा ऐकवली जाते. त्यानुसार, घरच्यांना आणि समाजाला त्यांचे प्रेम मान्य नसल्याने लैला मजनू घरातून पळून गेले आणि राजस्थानच्या एका वाळवंटात पोहोचले. येथे पाण्याने तडफडून दोघांचाही मृत्यू झाला.