Join us

शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:35 IST

शाहीद-करीनाशिवाय चाहते आदित्य-गीत या पात्रांचा विचारही करु शकत नाही.

'जब वी मेट' (Jab We Met) हा इम्तियाज अलीचा सिनेमा आजही तरुणांच्या आवडत्या सिनेमांच्या यादीत 'टॉप' ला आहे. शाहीद-करिनाच्या जोडीवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. त्यांच्या केमिस्ट्रीचे लोक आजही चाहते आहेत. शाहीद-करिनाशिवाय (Shahid Kapoor-Kareena Kapoor) कोण 'जब वी मेट'चा म्हणजेच आदित्य-गीत या पात्रांचा विचारही करु शकत नाही. पण ही जोडी सिनेमासाठी पहिली निवड नव्हतीच. इम्तियाज अलीने आधी सिनेमा कोणाला ऑफर केला होता माहितीये का? 

Galatta India ला दिलेल्या मुलाखतीत इम्तियाज अली म्हणाला, "जब वी मेटसाठी आधी शाहीद माझी पहिली पसंत नव्हता. मी बॉबी देओलला आदित्यची भूमिका ऑफर केली होती. मी जेव्हा बॉबी देओलचा भाऊ अभय देओलसोबत सोचा ना था सिनेमाचं शूट करत होतो तेव्हाच मी बॉबीला जब वी मेटसाठी कास्ट करण्याचा विचार केला होता. सोचा ना था सिनेमा बनून रिलीज व्हायला पाच वर्ष लागली होती. या वेळात मी बॉबी सोबत बराच वेळ घालवला. तो माझ्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक आहे. म्हणूनच त्याला घेऊन जब वी मेट करायचं ठरवलं होतं. मात्र बरीच वर्ष गेल्यानंतरही सिनेमा काही बनला नाही. बॉबी तेव्हा वेगळ्या कामात होता त्यामुळे मला वाटलं ठीक आहे हा सिनेमा एकत्र होणार नाही."

तो पुढे म्हणाला, "बऱ्याच वर्षांनी मी शाहीदला या सिनेमासाठी विचारणा केली. मला आदित्यच्या भूमिकेसाठी शाहीद फारच छोटा आहे असं वाटत होतं. मात्र नंतर त्यालाच फायनल करण्यात आलं. गीत च्या भूमिकेसाठी आधी मी प्रिती झिंटाला विचारणा केली होती. पण शाहीदला फायनल केल्यानंतर करीना कपूरच माझी पहिली पसंत होती. प्रिती झिंटा खरंतर पहिली आहे जिने माझ्या स्क्रीप्टची स्तुती केली होती. कारण माझा हा सिनेमा अनेकांनी रिजेक्ट केला होता. कोणीच घ्यायला तयार नव्हतं. पण प्रितीला स्क्रीप्ट आवडली होती. म्हणूनच आधी बॉबी देओल आणि प्रिती झिंटासोबत मी सिनेमा बनवणार होतो."

टॅग्स :इम्तियाज अलीबॉबी देओलप्रीती झिंटाशाहिद कपूरकरिना कपूर