Join us

'या' अभिनेत्याच्या घरातच नोकराने केलेली आत्महत्या, शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने समोर आली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:51 AM

२०१३ साली अभिनेता या धक्कादायक कारणाने चर्चेत आला होता.

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) सध्या 'ड्रीम गर्ल 2' मुळे चर्चेत आहे. नुकतंच अभिनेत्याने ३९ वा वाढदिवस साजरा केला. त्याने आपल्या अभिनयाने आणि आवाजाने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. २०१३ साली अभिनेता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला होता. आयुष्मानच्या मुंबई येथील फ्लॅटमध्ये त्याच्या नोकराने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

ही २०१३ ची घटना आहे. आयुष्मान खुराना सुरुवातीच्या काळात गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये राहत होता. शूटिंगसाठी तो चंदीगढला गेला असता अभिनेत्याच्या घरातच नोकराने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. शिवप्रसाद असं त्याचं नाव होतं. तो केवळ २६ वर्षांचा होता. १० वर्षांपासून तो आयुष्मानकडे काम करत होता. त्याने असं टोकाचं पाऊल का उचललं ते समोर येऊ शकलं नाही. दुर्दैव म्हणजे त्याच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी पोलिसांना सूचना केली असता ही घटना उघडकीस आली. तोपर्यंत शिवप्रसादचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. तीन दिवसांपूर्वीच त्याने आत्महत्या केल्याचं पोस्टमार्टममध्ये समोर आलं होतं.

आयुष्मान शूटसाठी चंदीगढला होता तर त्याची पत्नीही बाहेर होती. या घटनेनंतर आयुष्मानला मोठा धक्का बसला होता. हे फारच दुर्दैवी आहे. या घटनेने मी खूप दु:खी झालो आहे असं तो म्हणाला होता.

या घटनेच्या आदल्याच वर्षी आयुष्मानने 'विकी डोनर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सिनेमाने त्याला ओळख मिळवून दिली. इतकंच नाही तर सिनेमातील त्याने स्वत: गायलेल्या 'पानी दा' या गाण्यानेही तो लोकप्रिय झाला आणि बॉलिवूडला एक नवीन गायकही मिळाला.

टॅग्स :आयुषमान खुराणामुंबईबॉलिवूड