नेटफ्लिक्सवर नुकतीच लस्ट स्टोरीज २ (Lust Stories 2) ही वेबफिल्म रिलीज झाली आहे. ही बोल्ड वेबफिल्म असून यातील सीन्समुळे हा सिनेमा चर्चेत होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात वेगवेगळ्या ४ कथा दाखवण्यात आल्या आहेत. त्यातील एका कथेत मराठमोळ्या अभिनेत्रीनेही बोल्ड सीन्स दिले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष (Amruta Subhash).
लस्ट स्टोरीज२ मध्ये अमृता सुभाष आणि मराठी अभिनेता श्रीकांत मोहन यादव यांनी इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यांच्या या सीन्सची सर्वत्र खूप चर्चा झाली. या सिनेमात श्रीकांतने अमृताच्या पतीची भूमिका केली आहे. तर अमृताने मोलकरणीची भूमिका केली आहे. तर श्रीकांत यादवने कुरिअर मॅनची भूमिका केली आहे. अमृता अभिनेत्री तिलोतमाच्या घरी घरकाम करताना दाखवली आहे. ती घरात नसताना हे नवरा बायको रोमांस करताना दाखवले आहेत. एक दिवस तिलोतमा त्यांना रंगेहाथ पकडते, त्यानंतर काय होते हे दाखवण्यात आले आहे.
प्रोजेक्ट्सपेक्षा नेहमीच मला माणसं महत्त्वाची वाटतात
दरम्यान अमृता सुभाषने इंस्टाग्रामवर कोंकणा सेन सोबतचे फोटो शेअर करत तिचे आभार मानले आहेत. तिने लिहिले की, या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी तिला पहात आले आहे. मिस्टर एंड मिसेस अय्यर पहिला आणि तिच्या प्रेमात पडले. तेव्हापासून तिच्याबरोबर काम करायचं स्वप्नं अखेर आयुष्यानं पुरं केलं. आत्ता लस्ट स्टोरीज तिनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा भाग होताना जाणवलं, ती उत्तम अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, त्याहूनही उत्तम माणूस आहे. मला नेहमीच प्रोजेक्ट्स पेक्षा माणसं महत्त्वाची वाटत आली आहेत. त्यामुळे एखादंप्रोजेक्ट खूप यशस्वी होऊनही जर त्या माणसांशी जुळलं नाही तर हिरमुसायला होतं. लस्ट स्टोरीज काल नेटफ्लिक्स वर रिलीज झाल्यापासून त्यातल्या आमच्या कथेला कालपासून इतकं प्रेम मिळतं आहे याच्या आनंदाइतकाच कोंकणासारखं माणूस आयुष्यात आलं साचा आनंद मोठा आहे.
तिने पुढे म्हटले की, मी मराठीत जास्त काम केलं असल्यानं हिंदीतली फार कमी माणसं मला माहीत आहेत. कुठल्याही हिंदीतल्या पार्टयांना गेलं की मला फारशी माणसं माहीतीची नसतात. कोंकणा अशावेळांना माझा हात हातात घेऊन मला ओढत कुठेशी नेते आणि कुणाकुणाला माझ्याविषयी भरभरून काही सांगत रहाते. मधेच मी कुणाशी काय बोलावं हे न सुचून बाजूला उभं राहून माणसांना निरखत असते तेव्हा ही कुठुनशी अवतरते आणि विचारते,”ठीक आहेस ना? चल थोडा वेळ डान्स करुया?” डान्स सुरु झाला आहे कोको! खूप मजा येते आहे.. येत रहाणार आहे.