हिंदी सिनेसृष्टीतील अशी अभिनेत्री जी अभिनयासोबतच अफेयर्समुळे खूप चर्चेत आली होती. आजही त्यांच्या प्रेमाची चर्चा होताना दिसते. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्याबद्दल, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांना आपले फॅन बनवले. रेखा १० ऑक्टोबर रोजी त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. पण त्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे. आजही त्या आपल्या सौंदर्याने अनेक सौंदर्यवतींना टक्कर देतात.
बिग बी अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले की जया बच्चन यांच्यासोबत रेखा यांचे नाव डोळ्यासमोर येते. रेखा यांचे अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम होते हे अभिनेत्रीने स्वतः अनेक प्रसंगी मान्य केले आहे. इंडस्ट्रीतही त्यांच्या छुप्या प्रेमाची बरीच चर्चा झाली होती. अमिताभ बच्चन यांनी हे प्रेम कधीच स्वीकारले नाही. रेखा यांच्या करिअरबद्दल सांगायचे तर, त्यांना कधीही चित्रपटात काम करण्याची इच्छा नव्हती. एअर होस्टेस होण्याचे त्यांचे स्वप्न होते पण घरची परिस्थिती पाहता त्यांना काम करणे योग्य वाटले. या इंडस्ट्रीत त्यांनी पहिले पाऊल तेलुगु चित्रपटातून टाकले. रेखा यांना तिचे चित्रपट पाहणे अजिबात आवडले नाही कारण त्यांनी सांगितले की यामुळे त्या त्यांचे बालपण जगू शकल्या नाहीत.
पहिल्या किसिंग सीननंतर बेशुद्ध पडली होती अभिनेत्रीफार कमी लोकांना माहित असेल की रेखा तितक्याच छान गातात आणि त्या अभिनय करतात. रेखा यांनी १९८० साली रिलीज झालेल्या 'खूबसूरत' चित्रपटातील दोन गाण्यांना आवाज दिला होता. रेखा यांच्या खणखणीत आवाजातील 'कायदा-कायदा' आणि 'सारे नियम तोड' आजही प्रेक्षकांना आवडते. याशिवाय रेखा यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटाने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. १५ वर्षांच्या रेखा यांनी 'अंजाना सफर'मध्ये त्यांच्यापेक्षा २५ वर्षांनी मोठ्या असलेल्या हिरोसोबत किसिंग सीन करून खळबळ उडवून दिली होती. सुमारे ५ मिनिटे चाललेला हा सीन केल्यानंतर रेखा बेशुद्ध झाल्या होत्या.