Join us  

चॅलेंज ! फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 4:15 PM

Guess Who: इंटरनेटवर एक फोटो खूप लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार एकत्र आहेत.

Guess Who: इंटरनेटवर एक फोटो खूप लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार एकत्र आहेत. फोटोत दिसणारी ही मुले आज फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे झाले आहेत. मात्र, या फोटोत त्यांना ओळखणे सोपे नाही. या व्हायरल फोटोमध्ये फिल्म इंडस्ट्रीतील 5 स्टार्स आहेत, पण त्यांना ओळखणे फार कमी लोकांना जमले आहे. हा ग्रुप फोटो कपूर कुटुंबाचा आहे. तुम्ही यापैकी काही ओळखू शकाल का?

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सोनम कपूर(Sonam Kapoor), रणबीर कपूर(Ranbir Kapoor), अंशुला कपूर (Anshula Kapoor), अर्जुन कपूर(Arjun Kapoor), अनिल कपूर(Anil Kapoor)चा मुलगा हर्षवर्धन कपूर (Harshwardhan Kapoor) फोटोत शेवटी बसलेला मुलगा ज्याने विक्ट्री साईन केलं आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून रणबीर कपूर आहे. अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा भाऊ हर्षवर्धन कपूरसोबत दिसत आहे. सोनमच्या शेजारी अर्जुन कपूर लाल टी-शर्टमध्ये चष्मा घातलेला आहे.  सोनमच्या मागे अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर एका मुलाला मांडीवर घेऊन बसली आहे. आता कपूर कुटुंबातील स्टार्सचा हा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर खूप लक्ष वेधून घेत आहे. फोटोवर कमेंट्सद्वारे चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने फोटोवर कमेंट केली की, 'मी अर्जुन आणि सोनम कपूरला ओळखत होतो'. याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, 'बेस्ट इज कपूर फॅमिली'. यूजर्स सतत या फोटोवर लाईक्स वर्षाव करत आहेत. 

टॅग्स :सोनम कपूरअर्जुन कपूरअनिल कपूर