Join us  

राम मंदिर उद्घाटनासाठी अनेक सेलिब्रिटींना आमंत्रण, कंगना रणौतचं मात्र यादीत नावच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 12:22 PM

३ हजार VVIP सह ४ हजार साधूसंत अशा एकूण ७ हजार लोकांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

Ayodhya Ram Mandir: 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारोहाला देशभरातून अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. बुधवारी याबबात माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ३ हजार VVIP सह ४ हजार साधूसंत आणि एकूण ७ हजार लोकांना आमंत्रण देण्यात आलं आहे. या यादीत 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल , सीता मातेच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या नावाचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिनेत्री कंगना रणौतला निमंत्रण मिळालेलं नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राणप्रतिष्ठेला पहिलं आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यांच्या हस्ते राम मंदिराचा शुभारंभ होणार आहे. तसंच भारतरत्न सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी, अक्षय कुमार, आशा भोसले यांना आमंत्रित करण्यात आलंय. या यादीत अभिनेत्री कंगना रणौतचे नाव नसल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. सकाळी ११ वाजता कार्यक्रम सुरु होईल. सुमारे ३ तास हा कार्यक्रम असणार आहे. 

कंगना रणौत गेल्या महिन्यातच रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचली होती. तेव्हा ती तिच्या 'तेजस' सिनेमाचं प्रमोशन करत होती. मंदिर बनवण्याऱ्यांसोबत तेव्हा तिने बातचीतही केली होती.तसंच ती अनेकदा राम मंदिर बाबतीत आपलं मत मांडत असते. त्यामुळे राम मंदिराच्या उद्घाटनाला कंगना रणौतला निश्चितच आमंत्रण मिळेल असं म्हटलं जात होतं. मात्र निमंत्रितांच्या यादीत तिचं नाव नसल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

या कार्यक्रमासाठी 1992 मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. आमंत्रित व्हीव्हीआयपींमध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत, योग गुरु राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपति गौतम अधाणी यांचाही समावेश आहे.

टॅग्स :कंगना राणौतअयोध्याराम मंदिर