एका पौराणिक चित्रपटात सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान (Kareena Kapoor) दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि बेबो वादात सापडली. सीता मातेच्या या भूमिकेसाठी बेबोने 12 कोटी रूपयांची मागणी केल्याची चर्चा कानावर आल्यावर तर लोक आणखीच बिथरले. करिनाविरोधात संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर सीता मातेच्या भूमिकेत करिना दिसलीच तर तिला बॉयकॉट करू, सिनेमाचे प्रदर्शन हाणून पाडू, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. इतके कमी की काय म्हणून बरजंग दलानेही या वादात उडी घेतली. तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतोच, अशी धमकीवजा इशाराच बजरंग दलाने दिला. (Boycott Kareena Kapoor Khan has been trending on Twitter)आता काय तर करिनाच्या जागी सीता मातेच्या भूमिकेसाठी नुकतीच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री यामी गौतमला (Yami Gautam) घ्यावं, अशी मागणी चाहत्यांनी लावून धरली आहे.
यामी या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. करिनाच्या जागी तिलाच ही भूमिका मिळायला हवी, अशा आशयाच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. तूर्तास तरी या वादावर कुण्याही निर्मात्याची वा करिनाची प्रतिक्रिया आलेली नाही. आता हा वाद कोणत्या वळणावर जातो ते बघूच.
बजरंग दलाचे जिल्हाधिका-यांना निवेदनटाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार नागपूरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी करीना कपूरच्या विरोधात जिल्हाधिका-यांकडे एक निवेदन दिलं आहे. करीना कपूरला घेऊन हा चित्रपट तयार झालाच तर आम्ही त्याच्यावर बंदी घालू असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. आपल्या निवेदनात त्यांनी करीनाचे बिकिनी फोटो आणि ती अजमेर दरगाहला गेलेली असतानाचे फोटो देखील दिले आहेत.