Join us

"टीम इंडिया खराब खेळली', वर्ल्डकपमधील भारताच्या खेळीवर विवेक ओबेरॉयने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाला, "२०११ प्रमाणे आपण आज..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 9:15 AM

वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा झालेला पराभव क्रिकेटप्रेमींप्रमाणेच सेलिब्रिटींच्याही जिव्हारी लागला आहे. मॅच संपल्यानंतर विवेक ओबेरॉयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवला गेला. रविवारी(१९ नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात कांगारुंनी टीम इंडियाचा दारुण पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाबरोबरच १४० कोटी भारतीयांचं वर्ल्डकपचं स्वप्न भंगलं. वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी स्टेडियमध्ये उपस्थित होते. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, शाहरुख खान, आयुष्मान खुराना यांच्याबरोबरच विवेक ओबेरॉयदेखील टीम इंडियाला चिअर करताना दिसला. 

वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा झालेला पराभव क्रिकेटप्रेमींप्रमाणेच सेलिब्रिटींच्याही जिव्हारी लागला आहे. मॅच संपल्यानंतर विवेक ओबेरॉयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने भारतीय टीमने खराब कामगिरी केल्याचं म्हणत त्यांच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "माझं हृदय तुटलं आहे. २०११ प्रमाणे आपण आज तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकू असं वाटलं होतं. आपण जगातील सगळ्यात बेस्ट टीम आहोत. बेस्ट टीमने खराब खेळ खेळला, याचं जास्त वाईट वाटतंय. चांगली खेळी करणारी टीम सगळे सामने जिंकली पण आज हरली. यामुळे माझं हार्ट ब्रेक झालं आहे. आपण जिंकू शकलो असतो," असं विवेक ओबेरॉय म्हणाला. 

पुढे तो म्हणाला, "ऑस्ट्रेलिया आपल्यापेक्षा चांगली खेळली असं नाही. आपण नेहमीप्रमाणे चांगला खेळ खेळलो नाही. गेल्या १० सामन्यात आपल्या गोलंदाज आणि फलंदाजांनी जशी कामगिरी केली. तसे आज ते खेळले नाहीत. आज ते वाईट खेळ खेळले. मी नेहमीच टीम इंडियाचा फॅन राहिलो आहे. नेहमीच टीमला चिअर करतो. आज आपण जिंकलो असतो, तर ऐतिहासिक विजय ठरला असता."

टॅग्स :विवेक ऑबेरॉयआयसीसी आंतरखंडीय चषकरोहित शर्माऑफ द फिल्ड