Join us  

देशप्रेम व्यक्त करणारे Top 8 बॉलिवूड सॉन्ग्स; 'ही' गाणी ऐकल्यावर अभिमानाने येईल उर भरुन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 6:00 AM

Independence Day 2023: प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाविषयी प्रचंड प्रेम आहे. त्यामुळेच आपलं देशप्रेम अनेक सिनेमांमधून, गाण्यांमधून व्यक्तही करण्यात आलं आहे.

१५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत खास आहे. या दिवशी आपला देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व काही औरच आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाविषयी प्रचंड प्रेम आहे. त्यामुळेच आपलं देशप्रेम अनेक सिनेमांमधून, गाण्यांमधून व्यक्तही करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दोन खास दिवशी ज्यावेळी राष्ट्राभिमान व्यक्त करणारी गाणी कानावर पडतात त्यावेळी प्रत्येकाचं काळीज अभिमानाने फुलून येतं. त्यामुळेच देशभक्तीपर आधारित बॉलिवूड गाणी कोणती ते पाहुयात.

१. ए वतन-

आलिया भट्ट हिची मुख्य भूमिका असलेला राजी हा सिनेमा साऱ्यांच्याच लक्षात आहे. या सिनेमातील प्रत्येक गाणं सुपरहिट ठरलं. त्यातलंच एक गाणं म्हणजे ए वतन. हे गाणं प्रचंड गाजलं. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवर्जुन लावलं जातं.

२.चक दे इंडिया -

अभिनेता शाहरुख खान याच्या चक दे इंडिया या सिनेमातील हे गाणं आहे. हे गाणं ऐकल्यावर वातावरणात एक प्रकारचा जोश, उत्साह निर्माण होतो.

३.ए मेरे प्यारे वतन-

गेल्या कित्येक वर्षांपासून हे गाणं एव्हरग्रीन गाणं म्हणून ओळखलं जातं. काबुलीवाला या सिनेमातील हे गाणं मन्ना डे यांनी गायलं आहे. ए मेरे प्यारे वतन. असे बोल असलेलं हे गाणं ऐकल्यावर अनेकांच्या डोळ्याच्या कडा आपोआप पाणावतात.

४. ए मेरे वतन के लोगो -

लता मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजात हे गाणं गायलं गेलं होतं. हे गाणं ऐकत असताना त्या वेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना सुद्धा त्यांचे अश्रू अडवता आले नव्हते.लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक गाणे आहे.

५. आय लव्ह माय इंडिया -

परदेस या चित्रपटातील हे गाणं आहे. प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेले हे गाणे आणि या गाण्याचे बोल मनाला नक्कीच स्पर्शून जातात.

६. अब तुम्हारे हवाले वतन साथीयो -

हकीगत या चित्रपटातील अब तुम्हारे हवाले वतन साथीयो हे गाणे देशभक्तीपर गीतांमधील अनेकजणांचे सगळ्यात आवडते गाणे आहे.

७. रंग दे बसंती-

रंग दे बसंती या सिनेमातील हे गाणं आहे. या सिनेमाची कथा जरी आजच्या काळातील असली तरीदेखील त्या कथेचा संबंध हा भगत सिंग यांच्या काळाशी जोडण्यात आला आहे.

८. संदेसे आते है-

बॉर्डर चित्रपटातील संदेसे आते हे गाणे बॉर्डर वर असणाऱ्या सैनिकांची अवस्था अगदी योग्य रीतीने मांडते.

टॅग्स :स्वातंत्र्य दिनबॉलिवूडसिनेमा