Join us

मृत्यूनंतरही इंदर कुमारवर चालणार बलात्काराचा खटला; वाचा काय आहे प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 5:01 PM

सलमान खानचा जवळचा मित्र आणि बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार याचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. इंदरच्या निधनामुळे असे ...

सलमान खानचा जवळचा मित्र आणि बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार याचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. इंदरच्या निधनामुळे असे वाटत होते की, त्याच्यावर असलेला बलात्काराचा गुन्हा रद्द केला जाईल. परंतु आता यामध्ये एक ट्विस्ट आले आहे. होय, इंदरच्या निधनानंतरही त्याच्यावर असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याची सुनावणी सुरूच राहणार आहे. कारण इंदर कुमारची पत्नी पल्लवी हिने न्यायालयात एक अर्ज दाखल केला असून, त्यामध्ये याप्रकरणाची फाईल बंद न करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंदर कुमार व त्याच्यावर लावण्यात आलेला बलात्काराचा गुन्हा चर्चेत आला आहे. इंदरची पत्नी पल्लवीला याप्रकरणी न्याय हवा. तिला इंदर निर्दोष असल्याचे जगासमोर सिद्ध करायचे आहे. इंदर कुमारवर २०१४ मध्ये एका २५ वर्षीय मॉडेलने बलात्काराचा आरोप केला होता. मॉडेलने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘बॉलिवूडमध्ये ब्रेक देण्याचे स्वप्न दाखवित इंदरने तिचे लैंगिक शोषण केले आहे.’ यावर इंदरने म्हटले होते की, ‘आम्ही दोघेही एकमेकांच्या सहमतीने नात्यात होतो, त्यामुळे मी तिच्यावर बलात्कार केला हे पूर्णत: चुकीचे आहे.’ वास्तविक इंदरने संबंधित मॉडेलचे आरोप कधीच मान्य केले नाही, तो सातत्याने हे आरोप फेटाळत आला आहे.  विशेष म्हणजे या प्रकरणात त्यावेळी इंदरची पत्नी पल्लवी हिनेही त्याच्या बचावासाठी उडी घेतली होती. कदाचित यामुळेच पल्लवी हे प्रकरण बंद करू इच्छित नाही. पल्लवीला या प्रकरणाचा अंतिम निर्णय हवा आहे. पल्लवीच्या मते, या प्रकरणाचा निकाल तिच्या बाजूने लागणार आहे. जर पल्लवीच्या बाजूने निकाल लागला तर पल्लवी संबंधित मॉडेलला पुन्हा एकदा न्यायालयात खेचणार आहे. दरम्यान, इंदर कुमार बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याचा अगदी जवळचा मित्र होता. सलमानबरोबर तो अनेक चित्रपटांमध्ये बघावयास मिळाला आहे. जेव्हा इंदरला चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते, अशावेळेस सलमान त्याच्या मदतीला धावून आला होता. त्याचबरोबर त्याला आर्थिक मदतही केली होती. सलमानला इंदर मोठ्या भावाप्रमाणे समजायचा. कारण इंदरच्या प्रत्येक अडचणीच्या काळात सलमानने त्याला मदत केली होती. जेव्हा इंदर डिप्रेशनमध्ये गेला होता, तेव्हा सलमाननेच त्याला मदत केली होती.