इंदर कुमारची पहिली पत्नी सोनल करियाने इशा कोप्पीकर आणि इंदरच्या नात्याबद्दल केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2017 6:16 AM
अभिनेता इंदर कुमारचे नुकतेच निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याची पहिली पत्नी सोनल करियाने एक मोठा खुलासा केला आहे. सोनल ...
अभिनेता इंदर कुमारचे नुकतेच निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याची पहिली पत्नी सोनल करियाने एक मोठा खुलासा केला आहे. सोनल आणि इंदरमध्ये दुरावा का निर्माण झाला होता हे तिने मीडियाला नुकतेच सांगितले आहे. अभिनेत्री इशा कोप्पीकर आणि इंदरचे अनेक वर्षं अफेअर होते. ते दोघे लग्न करतील असेच सगळ्यांना वाटत होते. पण त्याच्या स्वभावामुळे आणि त्याच्या वाईट सवयींमुळे इशाने इंदरसोबत ब्रेकअप केले. इशासोबत ब्रेकअप झाल्यानंतर इंदरने सोनलशी लग्न केले. पण इंदर आणि सोनलच्या घटस्फोटासाठी इशाच जबाबदार असल्याचे सोनलने नुकतेच म्हटले आहे. इशासोबत ब्रेकअप झाल्यानंतरही इंदर तिला विसरू शकला नव्हता असे सोनलने सांगितले आहे. याच कारणामुळे सोनलने इंदरला घटस्फोट दिला होता. सोनलसोबत घटस्फोट झाल्यानंतर काही वर्षांत इंदरने पल्लवीशी लग्न केले तर सोनलने देखील दुसरे लग्न केले.सोनलने इंदरच्या निधनानंतर स्पॉटबॉय या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आमच्या लग्नानंतर देखील इंदर इशाला विसरू शकला नव्हता. मी इशाला भेटायला जातो असे अनेकवेळा तो मला सांगत असे. त्यावर इशाला कधीतरी घरी घेऊन ये असे मी त्याला सांगायचे. पण त्याने कधीच तिला घरी आणले नाही. माझ्या घटस्फोटानंतर देखील तो इशाच्या संपर्कात असल्याचे मी ऐकले होते. खरे तर लग्नाच्या वेळेसच इंदर इशाला आजही विसरलेला नाही असे मला अनेकांनी सांगितले होते. पण त्याकडे मी दुर्लक्ष केले होते. केवळ इशाच आमच्या घटस्फोटासाठी कारणीभूत होती असे मी म्हणू शकत नाही. कारण इंदरला दारू आणि ड्रग्सचे व्यसन होते. त्यामुळे त्याच्यासोबत राहाणे माझ्यासाठी खूप कठीण झाले होते. मी त्याला ड्रग्सच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण काहीच झाले नाही. इंदरचे चित्रपट चालत नसल्याने तो खूप दुःखी असयचा. दिवसातील अनेक तास तो त्याच्याच विश्वात रमलेला असायचा. गरोदर असताना मी इंदरच्या आयुष्यातून निघून गेली. मी गरोदर असल्याचे त्याला मेसेज करून कळवले देखील होते. पण त्याने त्यावर साधा रिप्लाय देखील केला नव्हता. Also Read : इंदर कुमारच्या निधनानंतर त्याच्या पूर्वप्रेयसीने दिली ही प्रतिक्रिया