Indian Cinema: परदेशातही हिंदी सिनेमांचा बोलबाला; शंभरहून अधिक देशांमध्ये हिंदी चित्रपटांचे चाहते

By संजय घावरे | Published: February 5, 2023 10:36 AM2023-02-05T10:36:59+5:302023-02-05T10:40:42+5:30

Indian Cinema: 'पठाण'च्या निमित्ताने हिंदी सिनेमाने जागतिक पातळीवरील मोठ्या बाजारपेठेचा कॅनव्हास आणखी रुंदावल्याचे पहायला मिळत आहे.

Indian Cinema at global box office; Hindi movie fans in more than hundred countries | Indian Cinema: परदेशातही हिंदी सिनेमांचा बोलबाला; शंभरहून अधिक देशांमध्ये हिंदी चित्रपटांचे चाहते

Indian Cinema: परदेशातही हिंदी सिनेमांचा बोलबाला; शंभरहून अधिक देशांमध्ये हिंदी चित्रपटांचे चाहते

googlenewsNext

 भारतात हॉलिवूडपट प्रदर्शित होणार असला की हिंदीसोबतच प्रादेषिक चित्रपटही सेफ मोडमध्ये जात त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरतात, पण आता परिस्थिती बदलली आहे. जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये 'पठाण'ने २५९.६ कोटी रुपये कमवले आहेत. केवळ नऊ दिवसांमध्ये 'पठाण'ने ७०० कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. 'पठाण'च्या निमित्ताने हिंदी सिनेमाने जागतिक पातळीवरील मोठ्या बाजारपेठेचा कॅनव्हास आणखी रुंदावल्याचे पहायला मिळत आहे.

हॉलिवूडला सिक्वेलपटांसोबतच सुपर हिरोपटांची खूप मोठी परंपरा आहे. हे चित्रपट मागील काही दशके जगभरातील सिनेप्रेमींचे मनोरंजन करत आहेत. या तुलनेत भारतात यशस्वी झालेले हिंदी चित्रपट जागतिक पातळीवर हॉलिवूडपटांसारखा वेगवान व्यवसाय करण्यात यशस्वी होत नव्हते, पण शाहरुख खानच्या 'पठाण'ने सर्व गणिते मोडीत काढत जागतिक बाजारपेठेतही हिंदीचा दबदबा निर्माण केला आहे. 'पठाण'ने भारतात ३६४.१५ कोटी आणि जगभरात २५९.६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. युएसए, गल्फ, कॅनडा, युके, युरोप, चायना, जापान, सौदी अशा जवळपास १०० हून अधिक देशांमध्ये चित्रपट रिलीज करण्यासाठी देश पातळीपासून तिथल्या स्थानिक लेव्हलपर्यंतचे नेटवर्क स्ट्राँग असावे लागते. यात सध्या यशराज फिल्म्स आणि डिज्ने-फॅाक्स आघाडीवर आहेत. यांचे जागतिक स्तरावरील नेटवर्क मजबूत असून, बऱ्याच देशांमध्ये यांची कार्यालयेही आहेत. मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, हाँगकाँग अशा छोट्या देशांमधील वितरकांसोबत यांचे टाय-अप असते. नगडी स्टारकास्ट असलेले सिनेमे भारताबाहेर लोकल सबटायटल्ससोबत प्रॅापर रिलीज होतात. 'ए' ग्रेड स्टार्सच्या चित्रपटांना परदेशात खूप मागणी आहे. यात शाहरुख आघाडीवर असून त्याचा पॅाप्युलॅरीटी रेशो जवळपास ९०% आहे. आमिर खानही पॅाप्युलर आहे, पण तो फार सिनेमे करत नाही. सलमानचा रेशो ५०-६०% आहे. प्रत्येक चित्रपट ओव्हरसीज व्यवसाय करेलच असे सांगता येत नाही. कधी-कधी 'दृश्यम' आणि 'उरी'सारखे चित्रपटही ओव्हरसीज मार्केटमध्ये तगडा व्यवसाय करतात. अशा प्रकारच्या चित्रपटांकडून खूप मोठ्या व्यवसायाची अपेक्षा नसते, पण ते बाजी मारतात. हे सर्व गणित लोकल मार्केटिंग आणि प्रमोशनवर अवलंबून आहे.

फेस व्हॅल्यू महत्त्वाची...
एखादा सिनेमा देशाबाहेर न्यायचा असेल किंवा बाहेरून आपल्याकडे आणायचा असेल तर फेस व्हॅल्यू खूप महत्त्वाची ठरते. दिग्दर्शक कोण आहे, प्रोडक्शन हाऊस कोणते आहे, स्टार कोण आहेत यावर मार्केट काबीज करणे किती सोपे आणि किती कठीण हे ठरत असते.

 चायनाचे मार्केट मोठे
आपल्याकडे १० हजार सिनेमागृहे आहेत, तर चायनामध्ये ३० ते ४० हजार सिनेमागृहे आहेत. त्यामुळे तिथे त्या पटीत सिनेमांचे शोजही लागतात आणि चायनीज व कोरियन मुव्हीज खूप चालतात. चायना-हाँगकाँग ही हिंदी सिनेमांसाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. 

ओव्हरसीजसाठी हे आवश्यक...
भारताबाहेर चांगला व्यवसाय करण्यासाठी कंटेंट महत्त्वाचा ठरतो. खिळवून ठेवणारे कथानक आणि स्टारडमचा एकत्रित इफेक्ट प्रेक्षकांवर होतो. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची ठरते. तिथल्या लोकांना मनोरंजक सिनेमे आवडतात. तिथले प्रेक्षक मोबाईलवर सिनेमे पाहणे टाळतात. सिनेमागृहांमध्येच जाऊन सिनेमा पाहण्याला प्राधान्य देतात.
 
'पी अँड ए' फॅक्टर
'पी अँड ए' याचा अर्थ प्रिंट अँड  ॲडव्हरटायझिंग... ज्या कोणत्या देशात चित्रपट रिलीज करायचा असतो, तिथे वेगळा 'पी अँड ए' खर्च करावा लागतो. भारतात जसे २५ ते ३० कोटी रुपये 'पी अँड ए'वर खर्च केले जातात, तसेच इतर देशांमध्येही ते करणे गरजेचे असते. हा खर्च न करता चित्रपट रिलीज केला तर त्याचा तितकासा फायदा होत नाही. 
 
हे आहे तज्ज्ञांचे म्हणणे
बॅालिवूडने पूर्वीपासूनच भारताबाहेर हात-पाय पसरले आहेत, पण 'पठाण'च्या निमित्तानं शाहरुखने चार वर्षांनी कमबॅक केल्याने हाईप झाली असून त्याचा फायदा चित्रपटाला झाला आहे. 'पठाण'प्रमाणेच इतर सर्व 'ए' ग्रेड हिंदी सिनेमे जगभर रिलीज होतात. 'पठाण'ने १०० देशांची लक्ष्मणरेषा पार केल्याचा फायदा निश्चितच भविष्यातील हिंदी सिनेमांना होईल.
 
भारताबाहेर हे आघाडीवर...
शाहरुख खान
सलमान खान
आमिर खान
अक्षय कुमार
रणवीर सिंह
..........................

    सिनेमा                   ओव्हसीज      एकूण
१    दंगल                       १४३०            १९६८.०३
२    बजरंगी भाईजान    ४७३.२५        ९६९
३    सिक्रेट सुपरस्टार    ७९४.५          ९६५
४    पीके                      २९६.५६        ७५३.३६
५    पठाण                   २५९.६           ७००
६    सुल्तान                  १९७.२           ६२३.३३
७    संजू                      १४७.७१         ५९८.८५
८    पद्मावत                १८४.६१           ५७१.९८
९    टायगर झिंदा है     १२९.३८           ५६५.१
१०    धूम ३                 १९२.२९           ५५६.७४

Web Title: Indian Cinema at global box office; Hindi movie fans in more than hundred countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.