बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर सध्या जाम चर्चेत आहे. सध्या नेहा ‘इंडियन आयडल’चे 11 वे सीझन जज करतेय. अलीकडे या शोमध्ये एका स्पर्धकाने नेहाचे बळजबरीने चुंबन घेतले होते. होय, आॅडिशनमध्ये पोहोचलेल्या एका स्पर्धकाने चक्क नेहा कक्करला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला होता. याचा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला होत्या. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. नेहाला एक स्पर्धक बळजबरीने किस करतोय, हे पाहूनही विशाल ददलानी आणि अनु मलिक या दोघांनी बघ्याची भूमिका का घेतली? ते गप्प का राहिलेत? असे सवालही नेटक-यांनी केले होते. खरे तर नेहाचे अनेक डायहार्ट फॅन्स आहेत. एक व्यक्ती तर तिच्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे. तो म्हणजे तिचा भाऊ.
नेहा तिच्या कुटुंबावर प्रचंड क्लोज आहे. कुटुंबासोबतचे अनेक फोटो ती सर्रास शेअर करत असते. गत 22 मेला नेहाने भाऊ टोनी कक्करसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ‘माझ्या भावाला भेटा, जो माझ्यावर सर्वाधिक प्रेम करतो, तितकेच मला रागावतो. मी आजपर्यंत त्याने म्हटलेली एकही गोष्ट टाळलेली नाही. तो म्हणतो, ते मी ऐकते. मी त्याच्याकडून खूप काही शिकले. लव यू भैय्या,’ असे नेहाने या फोटोसोबत लिहिले होते.
नेहाच्या या पोस्टवर टोनीनेही रिप्लाय दिला होता. ‘तुझ्यासाठी जीवही देईल, लव यू द मोस्ट माय स्टार नेहू... स्पीचलेस’ असे त्याने लिहिले होते.नेहाचे नुकतेच हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले. यानंतर इंडियन आयडॉल 10 चा स्पर्धक विभोर पाराशरसोबत तिचे जोडण्यात आले होते. विभोर आणि नेहा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विभोर चांगलाच खवळला होता