Join us

शोले चित्रपटात सुरुवातीला नव्हतेच सांबा हे पात्र, या कारणामुळे लिहिण्यात आले हे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 6:15 PM

अरे ओ सांभा, कितना इनाम रखे है सरकार हम पर…’, सांभा- ‘पूरे ५० हजार…’ ‘शोले’मधील हा संवाद आजही तितकाच लोकप्रिय आहे.

ठळक मुद्देजावेद अख्तर यांनी कार्यक्रमात सांगितले की, 'गब्बरसाठी जेव्हा आम्ही संवाद लिहित होते. तेव्हा आम्हाला त्यात आणखी एका पात्राची आवश्यकता वाटत होती

इंडियन आयडल या कार्यक्रमाचा हा सिझन चांगलाच वादात अडकला आहे. कधी स्पर्धकांच्या आवाजामुळे तर कधी या कार्यक्रमावर परीक्षकांनी केलेल्या वादामुळे हा कार्यक्रम चर्चेत येतो. या सिझनला चांगलाच टीआरपी असून या सिझनचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या या भागात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. अरे ओ सांभा, कितना इनाम रखे है सरकार हम पर…’, सांभा- ‘पूरे ५० हजार…’ ‘शोले’मधील हा संवाद आजही तितकाच लोकप्रिय आहे. शोले या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. त्यातही सांबा ही भूमिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. शोले सिनेमात सांभाच्या भूमिकेचा कशाप्रकारे समावेश करण्यात आला याविषयी जावेद अख्तर यांनी नुकतेच इंडियन आयडलच्या सेटवर सांगितले आहे.

जावेद अख्तर यांनी कार्यक्रमात सांगितले की, 'गब्बरसाठी जेव्हा आम्ही संवाद लिहित होते. तेव्हा आम्हाला त्यात आणखी एका पात्राची आवश्यकता वाटत होती. कारण गब्बरला पोलिसांनी त्याच्यावर काय बक्षिस ठेवले आहे, हे त्यानेच सांगणे मला बालिशपणाचे वाटत होते. त्यामुळे त्याची माहिती हे पात्र देईल असे मला वाटत होते. जेव्हा पटकथा लिहिण्यात आली, त्यावेळी सांबा नावाचे पात्र त्यात नव्हतं. पुढे हे पात्र लिहिण्यात आले आणि अरे ओ सांभा, सरकार कितना इनाम रखे हैं हमपर… हा संवाद लिहिण्यात आला. 

टॅग्स :जावेद अख्तर