सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम इंडियन आयडॉलचा १२वा सीझनमध्ये नुकतीच अभिनेत्री जया प्रदा यांनी हजेरी लावली होती. जया प्रदा सेट्सवर येणार म्हणून सगळे स्पर्धक खूप आनंदले आहेत. तसेच कार्यक्रमाचा होस्ट जय भानुशाली, परीक्षक विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया या खास पाहुणीचे आपल्या शो मध्ये स्वागत करताना खूप उत्साहात आहेत. जया प्रदा इंडियन आयडॉल सीझन १२च्या मंचाची शोभा वाढवणार आहे आणि या भागात आपल्या जीवन प्रवासातील काही किस्से प्रेक्षकांना सांगणार आहे. आपल्यात आणि श्रीदेवीमध्ये कधीच भावनिक नाते नव्हते आणि सेटवर आम्ही कधी एकमेकींशी बोललो नाही हे तिने सांगितले. ती म्हणाली की, श्रीदेवी ही बॉलिवूडमधली तिची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी होती. इंडियन आयडॉलच्या सेट्सवर सर्व अभिनेत्यांबरोबर आपले नाते कसे होते हे जया प्रदाकडून ऐकायला मिळेल.
Indian Idol 12 : जया प्रदा यांना श्रीदेवीशी धरलेल्या अबोल्याची वाटते खंत, सांगितला सेटवरील किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 15:19 IST