Join us

भारतीयांनी व्हावे कलरब्लार्इंड - पीसी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2016 4:16 PM

 प्रियंका चोप्रा सध्या हॉलीवूड प्रोजेक्ट्स क्वांटिका आणि बेवॉच यात बिझी आहे. एका मुलाखतीदरम्यान ती म्हणते,‘ बॉलीवूड सेलिब्रिटी म्हणून मला ...

 प्रियंका चोप्रा सध्या हॉलीवूड प्रोजेक्ट्स क्वांटिका आणि बेवॉच यात बिझी आहे. एका मुलाखतीदरम्यान ती म्हणते,‘ बॉलीवूड सेलिब्रिटी म्हणून मला काहीच वाटत नाही. मला मी भारतीय असल्याचा खुप अभिमान वाटतो. पण, मला ‘बॉलीवूड ’ किंवा भारतीय असे लेबल लावलेले आवडत नाही.दुसºया देशाहून आलेल्या व्यक्तीला आपण असे म्हणत नाही ना की, ‘स्पॅनिश सेलिब्रिटी पेनेलोप क्रुझ’, ‘इटालियन स्टार सोफि आ लोरेन’. तर मग मलाच बॉलीवूड म्हणून का लेबल लावलेले असते. मी स्वत:ला ग्लोबल करण्याकडे भर देते. मी कलर ब्लार्इंड होताना एबीसी चे मी आभार मानते की त्यांनी मला ‘क्वांटिको’ मध्ये घेतले.त्यातील भूमिका ही अ‍ॅस किकींग मेस गर्ल साठी होती. भारतीय मुलीसाठी नव्हे. त्यामुळे  कोणत्याही सेलिब्रिटीचे नाव घेण्यापूर्वी अगोदर त्याचे विशेषण किंवा ठिकाणाचे नाव घेतले जाऊ नये. कलाकार म्हणून सर्वांना वागवले गेले पाहिजे.