सिनेजगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. जीतू भाई या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते जितेंद्र शास्त्री(Jeetendra Shastri) यांचं निधन झाले आहे. 'ब्लॅक फ्रायडे' ते 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' अशा अनेक चित्रपटांमध्ये जितेंद्र यांनी आपल्या दमदार अभिनयाने वेगळी छाप सोडली होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच हिंदी थिएटरवर शोककळा पसरली आहे.
जितेंद्र शास्त्री यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या, पण आपल्या दमदार अभिनयाने ते या छोट्या पात्रांनाही त्यांनी जीवंत केलं होते. त्यांनी 'ब्लॅक फ्रायडे' 'दौर' 'लज्जा' 'चरस' यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. याशिवाय ते नाट्यविश्वातही खूप प्रसिद्ध होते. चित्रपटांसोबतच त्यांनी 'कैद-ए-हयात', 'सुंदरी' अशा अनेक उत्तम नाटकांमध्ये काम केले.
आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर जितेंद्र यांचे सहकारी कलाकार आणि प्रसिद्ध अभिनेते संजय मिश्रा यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संजय मिश्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून जितेंद्र शास्त्री यांच्यासोबतचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, 'जीतू भाई, तुम्ही असता तर तुम्ही असे काहीतरी बोलले असतात, 'मिश्रा काय वेळ आहे, मोबाईलमध्ये नावच राहत आणि व्यक्ती मात्र नेटवर्कच्या बाहेर गेली असती. तुम्ही आता या जगात नाहीत पण नेहमी माझ्या हृदयाच्या आणि मनाच्या जवळ राहाल.
याशिवाय सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) नेही जितेंद्र शास्त्री यांच्या निधनाबद्दल त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. फोटो शेअर करत सिंटाने लिहिले, 'तुम्ही आठवण कायम रहाल जितेंद्र शास्त्री.'