Join us

भारताच्या स्टार क्रिकेटपटूची बायोपीकसाठी रणबीर कपूरला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 14:01 IST

रणबीर कपूरचं नाव भारताच्या स्टार क्रिकेटपटूनं सुचवलंय. कोण आहे तो? जाणून घ्या

आजवर अनेक खेळाडूंवर बायोपीक आले आहेत. मेरी कॉम पासून मिल्खा सिंग पर्यंत अनेक भारतीय खेळाडूंवरील बायोपिक गाजले आहेत. आजही ज्या बायोपीकची चर्चा होते तो म्हणजे एम. एस. धोनी. सुशांत सिंग राजपूतची भूमिका असलेला हा बायोपीक चांगलाच गाजला. आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूवर बायोपीक येण्याची चर्चा आहे. आणि या बायोपीकमध्ये रणबीर कपूर भूमिका साकारण्याची शक्यता आहे. कोण आहे हा क्रिकेटपटू?

लखनऊ सुपरजायंट्सने एक व्हिडीओ शेअर केलाय या व्हिडीओत के.एल.राहूलला त्याच्यावर बायोपीक आला तर कोणी भूमिका साकारावी असं विचारण्यात आलं. तेव्हा राहूलने रणबीर कपूरचं नाव घेतलं. रणबीरने माझ्यावर बायोपीक आला तर त्यात भूमिका साकारावी अशी इच्छा राहूलने व्यक्त केली. त्यामुळे भविष्यात के.एल.राहूलवर बायोपीक आला अन् त्यात रणबीरने भूमिका साकारली तर आश्चर्य वाटायला नको.

लवकरच IPL च्या नव्या हंगामाला सुरुवात असून के. एल. राहूल लखनऊ टीमकडून खेळताना दिसेल. रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर. तो २०२३ मध्ये गाजलेल्या 'अॅनिमल' सिनेमात दिसला. सध्या रणबीर नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असून साई पल्लवी सितेच्या भूमिकेत झळकणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरआत्मचरित्रलोकेश राहुल