Join us  

"सुरुवातीला मला...", विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 5:21 PM

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी राजस्थानमध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले.

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी राजस्थानमध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनीही या जोडप्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. त्याचवेळी, लग्नाच्या इतक्या महिन्यांनंतर विकीने खुलासा केला की, सुरुवातीला कतरिना कैफ त्याच्याकडे इतके लक्ष का देत आहे याचे त्याला आश्चर्य वाटले होते.

विकी कौशलने नुकतेच 'वी आर युवाज' या टॉक शोच्या 'बी ए मॅन यार'च्या एपिसोडमध्ये दिसला होता. यादरम्यान त्याने शोचा होस्ट निखिल तनेजाकडे त्याच्या कतरिनासोबतच्या प्रेमकथेबद्दल अनेक खुलासे केले. विकी म्हणाला की, 'सुरुवातीला मला धक्काच बसला होता की बॉलिवूडचा एवढी मोठी स्टार मला भाव का देतेय. मला ही गोष्ट विचित्र वाटली. या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.

विकी म्हणतो, 'कतरिना खूप चांगली व्यक्ती आहे. जेव्हा मी तिला ओळखले तेव्हा मला वाटले की मी माझे संपूर्ण आयुष्य तिच्याबरोबर घालवू शकतो. मग एके दिवशी मी तिला मेसेज केला आणि डिनरसाठी विचारले. यानंतर आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पण कतरिना लग्नाला हो म्हणेल असे मला कधीच वाटले नव्हते. मात्र, आम्ही सुरुवातीपासूनच एकमेकांच्या बाबतीत सीरियस होतो. हे नातं पुढे जाईल असं आम्हा दोघांनाही आधीच वाटत होतं.

२०२१ साली कतरिना-विकीनं बांधली लग्नगाठ

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा २०२१ साली शाही विवाह झाला होता. त्याच वेळी, दोघांनीही लग्न होईपर्यंत त्यांचे नाते जगापासून आणि मीडियापासून लपवून ठेवले. राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका भव्य किल्ल्यात दोघांनी सात फेरे घेतले होते. या भव्य लग्नात कतरिना आणि विकीचे फक्त जवळचे मित्र आणि कुटुंब सहभागी झाले होते. त्याच्या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल