सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडे अचानक चर्चेत आलीय. अशात तिच्या आणि तिचा बॉयफ्रेन्ड विकी जैन या दोघांनी साखरपुडा केल्याचीही चर्चा आहे. अद्याप अंकिताने साखरपुडा केल्याची कबुली दिलेली नाही. मात्र सध्या व्हायरल झालेले काही फोटो पाहता अंकिता व विकीने गुपचूप साखरपुडा उरकल्याचे मानले जात आहे. या फोटोंमध्ये अंकिता व विकीचे कुटुंबही दिसतेय.
या फोटोत अंकिताची आई सुद्धा दिसतेय. अंकिताच्या हातांवर मेहंदी आहे. एका फ्रेममध्ये अंकिता, तिची आई व विकी असे तिघेही दिसत आहेत. केवळ इतकेच नाही तर अंकिताने आई व तिच्या होणा-या सासूबाईसोबतही फोटो क्लिक केला आहे.
हे फोटो अंकिता व विकीच्या साखरपुड्याचे आहेत, असे मानले जात आहे. काहींच्या मते, ते रोका सेरेमनीचे फोटो आहेत. हा साखरपुडा इंदूरमध्ये झाला की मुंबईत याचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही.
अंकिता आधी सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होते. जवळपास सहा वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकीची एन्ट्री झाली. गेल्यावर्षी अंकिता व विकीने मुंबईत 8 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. लग्नानंतर दोघेही याच फ्लॅटमध्ये राहणार असल्याचे कळते.
विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.अंकिता लोखंडे हिने छोट्या पडद्यावरून कारकीर्दीला सुरूवात केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिला पहिला ब्रेक मिळाला होता. या मालिकेतून ती खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर गेल्या वर्षी तिने कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.