Join us

कधी १२ लोकांसोबत एक रूममध्ये राहत होता रवि किशन, आता बघा त्याच्या आलिशान घराचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 18:33 IST

एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, तो त्याच्या स्ट्रगलच्या काळात मुंबईतील एका चाळीत राहत होता १२० वर्गफूट रूममध्ये ते १२ लोक राहत होते.

भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार रवि किशन याची ओळख करून देण्याची गरज नाही. बॉलिवूड, टीव्ही, तेलुगु सिनेमा, कन्नड सिनेमात काम करत तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. फक्त मनोरंजन क्षेत्रातच नाही तर रवि किशन याने राजकारणातही मोठा हात मारला. तो गोरखपूरमधून भाजपाचा खासदार आहे.

रवि किशनने इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी मेहनत केली आहे आणि अनेक अडचणींना सामनाही केला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, तो त्याच्या स्ट्रगलच्या काळात मुंबईतील एका चाळीत राहत होता १२० वर्गफूट रूममध्ये ते १२ लोक राहत होते. आज त्याचा स्वत:चं मोठं घर आहे. ज्यात अनेक खोल्या आहेत. मुंबईतील गोरेगावमद्ये असलेला हा फ्लॅट २० कोटी रूपयांचा आहे. रवि किशन इथे आपल्या परिवारासोबत राहतो. चला बघु घरातील आतले फोटो.

टॅग्स :रवी किशनबॉलिवूडटेलिव्हिजन