Join us

Inside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 08:00 IST

प्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. बॉलीवुडचा सुपरस्टार हृतिक रोशनचंही घर असंच आलिशान आहे. 

सेलिब्रिटींचं घर कसं असेल, त्यांच्या घरात काय आहे, त्यांनी घर कसं सजवलं आहे हे जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. त्यांच्या आयुष्यातील विशेषतः घराबाबत प्रत्येक गोष्ट ऐकायला मिळावी किंवा त्याची माहिती मिळावी अशी रसिकांची इच्छा असते. प्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. बॉलीवुडचा सुपरस्टार हृतिक रोशनचंही घर असंच आलिशान आहे. 

मुंबईतील जुहू परिसरातील प्राईम बीच इमारतीमध्ये हृतिक राहतो. हृतिकच्या याच घराचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत हृतिक आपला लेक रिहान आणि रिदानसह निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.हृतिकच्या आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी हृतिकने बरीच मेहनत घेतली आहे. 

या घराच्या फर्निचरची शॉपिंग हृतिकने आपल्या मेहुणीच्या घरातून केली आहे. याशिवाय विविध देशात सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या हृतिकने तिथून खरेदी केलेल्या वस्तूही त्याच्या घरात पाहायला मिळत आहेत. घराच्या भिंतीवरही काही सुंदर विचार लिहिलेले पाहायला मिळतात. 

यातील काही विचार हृतिकने स्वतः लिहले आहे. याशिवाय हृतिकचा त्याच्या मुलांसह फोटो कोलाजही पाहायला मिळत आहे. डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी हृतिकने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.

हृतिक रोशनप्रमाणेच अक्षयच्याही घराचे फोटो समोर आले आहेत.मुळात अक्षय कुमार बॉलिवू़च्या त्या काही निवडक अभिनेत्यांपैकी आहे ज्याला आपलं जीवन साध्या पद्धतीने जगायला आवडतं. अक्षय कुमार हा त्यांच्या शिस्तीसाठीही ओळखला जातो. त्याची ही शिस्त आणि त्याचा निटनेटकेपणा त्याच्या घरातही बघायला मिळतो. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने इंडस्ट्री सोडल्यावर इंटेरिअरचं काम सुरु केलंय. तिने तिच्या घराचंही सुंदर इंटेरिअर केलंय. 

टॅग्स :हृतिक रोशन