दबंग सलमान खानची प्रत्येक गोष्ट खास असते. मग त्याचा अभिनय असो, डान्स असो किंवा त्याच्या हरकती प्रत्येक बाब रसिकांसाठी स्पेशल असते. भाईजान म्हणून रसिकांच्या मनात घर केलेल्या आपल्या या लाडक्या अभिनेत्यावर ते जीव ओवाळून टाकण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. सलमानविषयी रसिकांचं प्रेम इतकं आहे की त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे याबाबत जाणून घेण्यास ते उत्सुक असतात.
मग ते त्याचं अफेअर असो, लग्नाच्या चर्चा किंवा मग त्याच्यावर सुरु असलेली कोर्ट केस असो, प्रत्येक विषयात सलमानच्या फॅन्सना रस असतो. अशा अनेक रसिकोत्सुक गोष्टींपैकी एक बाब म्हणजे सलमानचं घर. सलमानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स वांद्रे इथल्या घराबाहेर गर्दी करुन असतात.
मुंबईसह देशातील सलमानच्या प्रत्येक डायहार्ट फॅनला त्याच्या या घराचा पत्ता माहितीच असेल. मात्र त्याचं आणखी एक घर आहे. हे घर म्हणजे त्याचं आलिशान फार्महाऊस. या फार्म हाऊसविषयी रसिकांना फार काही माहित नाही. अनेकांनी हे पाहिलंसुद्धा नाही.
याच फार्महाऊसची आम्ही माहिती तुम्हाला देणार आहोत. सलमानचे हे फार्महाऊस मुंबईनजीकच्या पनवेलमध्ये आहे. या फार्महाऊसला अर्पिता असं नाव देण्यात आलेलं आहे. आनंदाचे क्षण सेलिब्रेट करण्यासाठी सलमान आणि त्याचे कुटुंबीय या फार्महाऊसवर येतात. ब-याच पार्ट्याचे साक्षीदार हे फार्महाऊस बनले आहे. विशेषतः खान कुटुंबीयांच्या आणि सलमानच्या वाढदिवसाच्या पार्ट्या इथं रंगल्या आहेत. सलमानचं हे फार्महाऊस दीडशे एकर जागेत पसरलं आहे.
आजूबाजूला डोंगर अन् त्या मधोमध हे विस्तीर्ण आलिशान असं सलमानचं फार्महाऊस पसरलंय. स्विमिंग पूल, बाईक रायडिंग आणि घोडेस्वारीसाठी या फार्महाऊसमध्ये विशेष जागा ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी सलमानचे अनेक घोडेसुद्धा आहेत.
सलमान आपल्या फिटनेस आणि बॉडीबाबत बराच काटेकोर आहे. त्यामुळे कुठेही असला तरी तो आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष होऊ देत नाही. हीच बाब लक्षात घेऊन या फार्महाऊसवर सलमानसाठी खास सुसज्ज अशी जिमही उभारण्यात आली आहे. कुटुंबीयांसोबतच सलमाननं आपली गर्लफ्रेंड ल्युलियासोबतही बराच काळ या फार्महाऊसवर घालवल्याचे ऐकायला मिळालं होतं.
शिवाय आपल्या खास मित्रांसह सलमान याच फार्महाऊसवर धम्माल पार्ट्या करतो. इतकंच नाही तर दिलदार अशी ओळख असलेला सलमाननं आपल्या बॉलीवुडच्या मित्रांनाही या फार्महाऊसवर पार्ट्यांसाठी आमंत्रित केलं आहे.