Join us

कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यावर सोशल मीडियावर व्हायरल झाले हे मीम्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 16:46 IST

कंगनाचे अकाऊंट बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

ठळक मुद्देकंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यामुळे नेटिझन्स अनेक मीम्स शेअर करत आहेत.

कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती देशातील अनेक सामाजिक प्रश्नांवर ट्विटरद्वारे भाष्य करत असते. तिचे ट्वीट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतात. तसेच तिला आजवर सोशल मीडियावर अनेकवेळा ट्रोल देखील करण्यात आले आहे. पण आता ट्विटरकडून तिचे ट्विटर अकाऊंटच बंद करण्यात आले आहे. कंगनाचे अकाऊंट बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यामुळे नेटिझन्स अनेक मीम्स शेअर करत आहेत. आता हृतिक रोशनची प्रतिक्रिया काय असणार, तसेच तिचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर ट्विटर आता कसं असणार अशाप्रकारचे अनेक मीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 

ट्विटरच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले असल्याचे तिच्या ट्विटर अकाऊंटवर सध्या दाखवण्यात येत आहे. कंगनाने पश्मिच बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्याबाबत एक ट्वीट केले होते. या वादग्रस्त ट्वीटमुळे तिच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई केली जावी अशी मागणी नेटिझन्सने सोशल मीडियावर केली होती.

टॅग्स :कंगना राणौत