Shah Rukh Khan: कोलकातामध्ये काल (२२ मार्च) IPL 2025 चा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन समारंभात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सह मालक शाहरुख खान (Shahrukh Khan) चर्चेत राहिला. शाहरुख खानने या सोहळ्यात चार चाँद लावले. शाहरुखनं आपल्या खास अंदाजात सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. या सोहळ्यातील शाहरुख खानचा राष्ट्रगीत गातानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या चर्चेत आहे.
आयपीएल २०२५ च्या उद्घाटन समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर येत आहेत. यात शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खान राष्ट्रगीत गाताना दिसतोय. राष्ट्रगीत गाताना शाहरुखच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. राष्ट्रगीत सुरू होताच शाहरुखनं चष्माही काढला होता. आयपीएल २०२५ च्या उद्घाटन समारंभात शाहरुख हा स्टायलीश लूकमध्ये दिसला. त्यानं काळ्या रंगाची पॅन्ट, काळा शर्ट आणि त्यावर काळे जॅकेट परिधान केले होते.
शाहरुख खाननं या समारंभात प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. शाहरुखसोबतच प्रसिद्ध रॅपर-गायक करण औजला, दिशा पाटानी आणि श्रेया घोषाल यांनी त्यांच्या सादरीकरणाने धमाल केली. शाहरुख खानने आरसीबीचा खेळाडू विराट कोहलीसोबत 'झूमे जो पठाण' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. शाहरुख खान आणि विराट कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.