Join us

लग्नातील बनियनवरील एन्ट्री नंतर आता लुंगीवर आला नुपूर, आमिरच्या जावयाचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 13:50 IST

आमिरच्या जावयाचा लुंगी डान्स, नुपूर शिखरेचा व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानने ३ जानेवारील कोर्ट मॅरेज पद्धतीने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्न केलं. आयरा आणि नुपूरच्या लग्नाला अंबानींसह बॉलिवूडमधील सिताऱ्यांनीही हजेरी लावली होती. कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता पारंपरिक पद्धतनी आयरा आणि नुपूर विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूर येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार असून सध्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत ते लग्नाचे कार्यक्रम एन्जॉय करत आहेत. 

लग्नात नुपूर मॅरेथॉन धावत बनियनवर आल्याने आमिरच्या जावयाल ट्रोल केलं गेलं होतं. आता नुपूरच्या लुंगी डान्सची चर्चा रंगली आहे. सध्या नुपूर आणि आयरा उदयपूरमध्ये आहेत. नुकतीच त्यांनी पजामा पार्टी होस्ट केली होती. या पार्टीत नुपूरने मित्रांसह लुंगीवर एन्ट्री घेतली. या पजामा पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आमिरचा जावई शाहरुख खानच्या लुंगी डान्स गाण्यावर मित्रांसह थिरकताना दिसत आहे. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यावर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, १० जानेवारीला आयरा आणि नुपूर पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतंच आयराचे मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले होते. ९ जानेवारीला त्यांचा संगीत सोहळा असणार आहे. लग्नानंतर आयरा-नुपूर १३ जानेवारीला मुंबईत रिसेप्शन देणार आहेत.  

टॅग्स :इरा खानआमिर खान