Join us

इरा खानने होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा, मराठमोळी अभिनेत्री कमेंट करत म्हणाली, "हे मी ऐकलेलं सगळ्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 14:16 IST

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. इरा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. इरा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. दोघांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. नुकतंच नुपूर आणि इराचं केळवण पार पडलं. नुपूरच्या कुटुंबीयांकडून दोघांच्या केळवणासाठी खास तयारी करण्यात आली होती. 

इराने केळवणासाठी खास नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला होता. लाल रंगाच्या साडीत इराचं सौंदर्य खुलून आलं होतं. नाकात नथ आणि केसांत गजरा माळून इराने पारंपरिक लूक केला होता. फुलांच्या ज्वेलरीने तिने साजही केला होता. तर नुपूरने पिवळ्या रंगाचा सदरा परिधान केला होता. इराने होणाऱ्या नवऱ्यासाठी खास मराठीतून उखाणा घेतला. "आता मला मराठी येते आणि मी पोपेयला घेऊन जाते," असा उखाणा इराने घेतला. नुपूरने त्याचं इन्स्टाग्राम आयडीवर पोपेय असं नाव ठेवलं आहे. 

इराने केळवणाचे काही फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. तिचं मराठी ऐकून मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषही थक्क झाली आहे. अमृताने तिच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. "आई गं...हे मी ऐकलेलें सगळ्यात गोड मराठी आहे आणि नऊवारी सुंदर दिसत आहे", असं अमृताने कमेंटमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, इरा आणि नुपूर यांनी २०२२ मध्ये साखरपुडा केला होता. आता लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.  

टॅग्स :इरा खानआमिर खानअमृता सुभाष