लंडनमध्ये उपचार घेत असलेल्या इरफान खानने शेअर केली काळजाला भिडणारी कविता...!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 05:19 AM2018-03-20T05:19:24+5:302018-03-20T10:49:24+5:30
‘एंडोक्राईन ट्यूमर’ या दुर्धर आजाराने पीडित बॉलिवूड अभिनेता इरफान खानवर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. इरफानच्या आजाराची बातमी ऐकल्यापासून ...
‘ ंडोक्राईन ट्यूमर’ या दुर्धर आजाराने पीडित बॉलिवूड अभिनेता इरफान खानवर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. इरफानच्या आजाराची बातमी ऐकल्यापासून त्याचे चाहते चिंतीत आहेत. पण इरफान मात्र अतिशय धैर्याने या आजाराला सामोरे जातो आहे. याचदरम्यान इरफानने आपल्या सोशल अकाऊंटवर कवि रायनर मारिया रिल्की यांची एक भावपूर्ण कविता आणि स्वत:च्याच सावलीचा एक फोटो शेअर केला आहे. ‘परमेश्वर आपल्यासोबत गुपचूप चालतो आणि तितक्याच हळूवार आपल्यासोबत बोलतो. तो एका जळत्या वातीसारखा आहे. ज्याच्या सावलीखाली आपण चालत असतो. आयुष्यात जे काही होतंय, ते होऊ द्या. मग ते चांगले असो वा वाईट. फक्त चालत राहा. कारण कुठलीही भावना अखेरची नाही. यालाच आयुष्य म्हणतात... ’ अशा आशयाची ही कविता इरफानने शेअर केली आहे. या कवितेवरून इरफानची मनोवस्था कळते. आपला आजार त्याने स्वीकारलायं आणि यातून बाहेर पडण्याचा विश्वास त्याच्याजवळ आहे.
‘आयुष्यात अचानक अशी काही वळणं येतात, की ते तुम्हाला पुढे जायला भाग पाडतात. माझे आयुष्यही गेल्या काही दिवसांत याच वळणावर येऊन ठेवले आहे. मला न्यूरो इंडोक्राईन ट्युमर नामक आजार झाल्याचे निदान झाले आहे. हा आजार स्वीकारणे सोपे नाही. पण माझ्या आजुबाजुला असलेल्या लोकांचे प्रेम आणि प्रार्थना यामुळे माझी आशा कायम आहे. उपचारासाठी मी विदेशात जातो आहे. माझ्यासाठी प्रार्थना सुरू ठेवा. माझ्या आजाराबदद्ल ज्या अफवा पसरवल्या जात आहे, त्याबद्दल मी सांगू इच्छितो की, न्युरो कायम मेंदूसाठी नसतो. माझे अधिकृत बयान येईपर्यंत ज्यांनी प्रतीक्षा केली, त्यांचे आभार. मी पुन्हा माझी कथा घेऊन परत येईल, या अपेक्षेसह... ’, असे tweet करत इरफानने त्याच्या आजाराची माहिती दिली होती.
ALSO READ : इरफान खानने केला आपल्या आजाराचा खुलासा, उपचारासाठी जाणार विदेशात!
सलाम बॉम्बे, फुटपाथ,साढे सात फेरे, पीकू, मदारी, पान सिंह तोमर,लाईफ इन मेट्रो,लाईफ आॅफ पाय, हिंदी मीडियम यासारख्या चित्रपटांत इरफान दिसला आहे. आपल्या नैसर्गिक अभिनयासाठी ओळखला जाणा-या इरफानचा स्वत:चा एक चाहता वर्ग आहे.