Join us  

इरफानच्या ‘मदारी’चे फर्स्ट पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2016 5:10 AM

 इरफान खान याचा उत्कृष्ट अभिनय, सादरीकरण, परफॉर्मन्स यांच्यामुळे बरेच चित्रपट इरफान खानला मिळत आहेत. आता त्याचा आगामी चित्रपट ‘मदारी’ ...

 इरफान खान याचा उत्कृष्ट अभिनय, सादरीकरण, परफॉर्मन्स यांच्यामुळे बरेच चित्रपट इरफान खानला मिळत आहेत. आता त्याचा आगामी चित्रपट ‘मदारी’ चे फर्स्ट पोस्टर आऊट करण्यात आले आहे.तो एकदम साध्या वेशात म्हणजेच ग्रे रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाचा डेनिम्स तसेच शूज त्याच्या हातात दिसत आहेत. डोक्याला त्याने कपडा बांधल्याचे कळते आहे. हा चित्रपट राजकीय वातावरणावर टीका करणारा आहे.या पोस्टरवर एक टॅगलाईन लिहिली आहे की,‘देश सो रहा हैं’ (द कंट्री इज स्लिपिंग). मदारी चित्रपट हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारसरणीवर आधारित आहे, अशा अफवा आहेत. निर्माते याविषयी काहीही बोलायला तयार नाहीत.