दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचा मुलगा बाबिल (Babil) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. या सिनेमासाठीची तयारी कधीच त्याने सुरू केली आहे. आता तर त्यासाठी शिक्षण सोडण्याचा त्याचा निर्णयही पक्का झाला आहे. ( Irrfan Khan son Babil drops out from film school of london)
डेब्यू सिनेमा साईन करण्यासाठी बाबिल लंडनच्या एका फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये एका अभ्यासक्रमासाठी गेला होता. पण आता त्याने हा कोर्स अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट मिनिस्टरमधील आपल्या मित्रांसाठी बाबिलने एक पोस्ट लिहिली आहे.
त्यात तो म्हणतो, ‘मी तुम्हा सर्वांना खूप मिस करेल मित्रांनो. मुंबईत माझे फक्त 2-3 मित्र आहे. तुम्हा सर्वांनी मला गोठवणा-या त्या ठिकाणी घरासारखी ऊब दिली. मी तिथलाच आहे, असे मला भासवले. खूप खूप आभार आणि प्रेम. आज फिल्म बीए अर्धवट सोडतोय. कारण मी अॅक्टिंगला माझा पूर्ण वेळ देऊ इच्छितो. गुडबाय युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिनिस्टर... माझ्या सच्च्या मित्रांना खूप खूप प्रेम...’आपल्या या पोस्टसोबत बाबिलने त्याच्या एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो त्याच्या अभ्यासक्रमादरम्यानचा आहे.
इरफान खान यांचे 29 एप्रिल 2020 रोजी निधन झाले होते. ते दोन वर्ष न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर नामक कॅन्सरशी लढत होते. वडिलांच्या निधनानंतर बाबिल सातत्याने त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. बाबिल लवकरच ‘काला’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. यात बाबिलसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.याशिवाय बाबिलने शूजीत सरकार यांचा एक सिनेमाही साईन केला आहे. शूजीत यांनी इरफान यांच्यासोबत ‘पीकू’ बनवला होता. यात दीपिका पादुकोण व अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते.