Join us

​इरफान खानने केला आपल्या आजाराचा खुलासा, उपचारासाठी जाणार विदेशात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 10:10 AM

गेल्या काही दिवसांपासून इरफान खानच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. इरफान एका दुर्धर आजाराने आजारी असल्याची खबर आली आणि सगळ्यांच्याच ...

गेल्या काही दिवसांपासून इरफान खानच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. इरफान एका दुर्धर आजाराने आजारी असल्याची खबर आली आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला.  बॉलिवूडचीही चिंता वाढली आणि यानंतर इरफानच्या आजाराबद्दल नाही नाही त्या बातम्या यायला लागल्या. इरफानला ब्रेन ट्युमर असल्याचे आणि तो चौथ्या स्टेजवर असल्याच्या बातम्या यादरम्यान आल्या. पण आता इरफानने स्वत:च आपल्या आजाराचा खुलासा केला आहे. होय, इरफानला  Neuroendrocine Tumor   झाल्याचे वैद्यकीय चाचण्यानंतर स्पष्ट झाले आहे. या उपचारासाठी इरफान लवकरच विदेशात रवाना होणार आहे.काही क्षणांपूर्वी इरफानने Twitter वर आपल्या या आजाराची माहिती दिली. ‘आयुष्यात अचानक अशी काही वळणं येतात, की ते तुम्हाला पुढे जायला भाग पाडतात. माझे आयुष्यही गेल्या काही दिवसांत याच वळणावर येऊन ठेवले आहे. मला न्यूरो इंडोक्राईन ट्युमर नामक आजार झाल्याचे निदान झाले आहे. हा आजार स्वीकारणे सोपे नाही. पण माझ्या आजुबाजुला असलेल्या लोकांचे प्रेम आणि प्रार्थना यामुळे माझी आशा कायम आहे. उपचारासाठी मी विदेशात जातो आहे. माझ्यासाठी प्रार्थना सुरू ठेवा. माझ्या आजाराबदद्ल ज्या अफवा पसरवल्या जात आहे, त्याबद्दल मी सांगू इच्छितो की, न्युरो कायम मेंदूसाठी नसतो. माझे अधिकृत बयान येईपर्यंत ज्यांनी प्रतीक्षा केली, त्यांचे आभार. मी पुन्हा माझी कथा घेऊन परत येईल, या अपेक्षेसह...’, असे इरफानने लिहिले आहे.सलाम बॉम्बे, फुटपाथ,साढे सात फेरे, पीकू, मदारी, पान सिंह तोमर,लाईफ इन मेट्रो,लाईफ आॅफ पाय, हिंदी मीडियम यासारख्या चित्रपटांत इरफान दिसला आहे. आपल्या नैसर्गिक अभिनयासाठी ओळखला जाणाºया इरफानचा स्वत:चा एक चाहता वर्ग आहे. त्याच्या आजारपणाच्या बातमीने साहजिकच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. चाहत्यांच्या सगळ्या सदिच्छा, प्रेम त्याच्यासोबत आहेत. आमच्याही सदिच्छा इरफानसोबत आहेत. अनेक संघषार्नंतर इरफान इथपर्यंत पोहोचला आहे. या संकटातूनही तो सहीसलामत बाहेर पडेल, अशी कामना करू या.