Join us  

कोरोना व्हायरसमुळे इरफान खानला आले होते टेन्शन, हे होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 5:28 PM

कोरोनामुळे अभिनेता इरफान खान चांगलाच टेन्शनमध्ये आला आहे.

ठळक मुद्देइरफानचा मुलगा बाबील हा लंडनमध्ये शिकत असून कोरोनामुळे लंडनमध्ये अनेक शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले आहेत.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. परदेशात तर कोरोनामुळे अतिशय भयाण परिस्थिती आहे. या सगळ्यात आता अभिनेता इरफान खान चांगलाच टेन्शनमध्ये आला आहे. कारण त्याचा मुलगा लंडनमध्ये अडकला असून तो भारतात कधी परतेल याची वाट इरफान पाहात आहे.

इरफानचा मुलगा बाबील हा लंडनमध्ये शिकत असून कोरोनामुळे लंडनमध्ये अनेक शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले आहेत. इरफानची पत्नी सुतापा सिकदरने दोन दिवसांपूर्वी फेसबुकला एक पोस्ट लिहिली आहे आणि त्यात लिहिले आहे की, विमानतळं बंद झाली असून भारतातील अनेक मुलं लंडनमध्ये अडकली आहेत. माझा मुलगा देखील त्यांच्यामधील एक असून आपण काहीच करू शकत नाही आहोत. मी भारत सरकारकडे माझ्या मुलासोबतच या सगळ्या मुलांसाठी मदत मागत आहे. लंडनमध्ये अडकलेल्या या भारतीय मुलांना सरकार का मदत करत नाहीये हेच मला कळत नाहीये. लंडनमध्ये सध्या वाईट परिस्थिती आहे. तेथील मुलांना भारतात लवकरात लवकर परत आणण्यात यावे...

सुतापाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर भारतीय सरकारने त्यांची मदत केली असून काहीच तासांपूर्वी इरफानचा मुलगा मुंबईत परतला आहे. इरफानच्या पत्नीने सोशल मीडियाद्वारे भारतीय सरकारचे आभार मानले आहेत.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :इरफान खान