इरफानचे आगळेवेगळे ‘फादर्स डे सेलिब्रेशन’; मुलासह पोहोचला साबरमती आश्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2016 3:29 PM
बॉलिवूड स्टार इरफान खान आणि त्याचा मुलगा अयान खान यांनी आजचा फादर्स डे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. दोघेही आज ...
बॉलिवूड स्टार इरफान खान आणि त्याचा मुलगा अयान खान यांनी आजचा फादर्स डे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. दोघेही आज अहमदाबादेतील साबरमती आश्रमात पोहोचले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या या आश्रमात इरफान व अयान यांनी बराच वेळ घालवला. बापूंच्या अनेक आठवणी, त्यांच्या वस्तू, त्यांचा चरखा अशा अनेक वस्तू त्यांनी बघितल्या. एवढेच नाही तर स्वत: चरख्यावर सूत कताई सुद्धा केली. साबरमती आश्रमात घालवेल्या क्षणांचे काही फोटो इरफानने टिष्ट्वटरवर शेअर केले आहेत. तुम्ही बघा तर!!