बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्या ना कोणत्या स्टार्सच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या येत असतात. अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) बऱ्याच दिवसांपासून सिने जगतात डेटिंग करत असल्याच्या बातम्या येत आहेत. जेव्हा हे दोघे अनेकवेळा इव्हेंटमध्ये एकत्र दिसले, तेव्हा लोक त्यांच्या अफेअरबद्दल अंदाज लावू लागले. यानंतर अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या अफेअरच्या बातम्या वेगाने पसरल्या. मात्र, या दोन्ही स्टार्सने या वृत्तांवर मौन बाळगले आहे. त्याचवेळी, आता अनन्या पांडेची आई भावना पांडे यांनी आपल्या मुलीच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या डेटींगबद्दल अनेकदा चर्चा होते. अलीकडेच दोघांच्या रॅम्प वॉकने अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान आता अनन्या पांडेची आई भावना पांडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, तिची मुलगी अविवाहित आहे. भावना पांडेने सांगितले की इंडस्ट्रीत अशा गोष्टी घडत राहतात आणि तिला वाटते की चांगले आणि वाईट दोन्ही स्वीकारले पाहिजे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांनी नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांना मिळणाऱ्या प्रेमावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.